मेथी गावाच्या सरपंचपदी रेखा बागले बिनविरोध
दोडाईचा (अख्तर शाह)
शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथे सरपंच पदी रेखा बागले बिनविरोध झाल्या अनेक महिन्यांपासून मेथी ग्रामपंचायत चर्चेत होते माजी सरपंच रमाकांत बागले यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सदस्यांनी अविश्वास दाखल करण्यात आला होता मेथी ग्रामपंचायतीचे पहिले लोकनियुक्त सरपंच म्हणून रमाकांत बागले हे पदावर विराजमान झाले होते गावात काही विकासकामांच्या माध्यमातून त्यांच्यावर राजकीय द्वेषापोटी भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले व त्यात नऊ सदस्यांनी त्यांच्या विरोधात अविश्वास मंजूर केला म्हणून त्यांचे सरपंचपद हे बात करण्यात आले परंतु सदर भ्रष्टाचाराचा विषय न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे अद्याप भ्रष्टाचार सिद्ध झालेला नसून पुढील सरपंच पदाची मेथी ग्रामपंचायतीची जागा एस. सी .राखीव असल्याने निवडून आलेले 11 सदस्यांमध्ये दोन जागा या ए .सी. वर्गाच्या होत्या त्यात रमाकांत बागले व त्यांच्या धर्मपत्नी सौ रेखा बागले हे वार्ड क्रमांक तीन मधून निवडून आल्या होत्या म्हणून रमाकांत बागले यांचे पद गेल्यामुळे एकमेव जागा ए.सी.ची रिक्त होती त्यावर निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून श्री संजय भाऊराव जगताप यांनी दिनांक 25 रोजी मुंबई ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक नियम 1964 अन्वये नियम 11 मधील पोट निवडणूक 2,3,4 ची अंमलबजावणी करण्यात
आली
दि 24/02/2022 फेब्रुवारी रोजी सरपंच पदाची निवडनुकी साठी विशेष सभा बोलविण्यात आली
सदर सरपंच हे अनुसूचित जाती प्रवर्ग साठी राखीव आपल्यामुळे निवडणुकी अनुसूचित जमाती प्रभागासाठी राखीव असलेल्यामुळे सदर सवर्ण समाजातील सदस्यांनी जाती दोषामुळे गटबाजीमुळे काही सदस्यांनी राजीनामा दिल्यामुळे सभेकरिता आवश्यक असणारी गणपूर्ती पंचायतीच्या सदस्यांची एकूण संख्या एक दूवितीयाशा इतकी नसल्याने असल्याने सदर मुंबई ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम 1964 मधील 11 वा नियम मधील पोट निवडणूक नियम (2) किंवा (3) नुसार ताहकूब केलेली सभा पोट नियम 4 नुसार दुसऱ्या दिवशी किवा त्याच ठिकाणी व त्याच वेळी पूर्ण भरण्यात येईल व या वेळी सदर अशा तहकुबची नोटीस पंचायतीच्या कार्यालयातील सूचना फलकावर लावण्यात येईल व यावी आणि अशी तहकूब केलेल्या सभेत किंवा त्यानंतर तहकूब केलेल्या कोणत्याही सभेत निवडणूक घेण्यात येईल मग गणपूर्ती झालेले असो व नसो मुंबई ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम 1164 मधील 11 वा नियम मधील पोट नियम 2,3 ,4 नुसार सभेची गणपुती कोरम ही सौ कोंडाबाई भास्कर सौर वि एँडीशनल कमिशनर अमरावती 2008 (6) ऑल महाराष्ट्र 2018 (6)महाराष्ट्र लाँ जर्नल 407)या दाव्यातील निर्णयास आधारभूत मानून ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्य संख्यापैकी जेवढ्या जागा रिकाम्या असतील त्या रिकाम्या जागा एकूण सदस्य संख्येतून कमी केल्यानंतर राहिलेले सदस्य संख्या ही त्या ग्रामपंचायतेची सदस्य संख्या असते त्या संख्येच्या 1/2 सदस्य संख्या हि सरपंच व उपसरपंच ह्यांच्या निवडणुकीसाठी बोलविलेल्या सभेसाठी आवश्यक असणारी गणपूर्ती असते.
लेखी अजेंडा देण्यात आला तरीदेखील ते मिटींगला नऊ सदस्य गैरहजर होते त्या दिवसाची मिटिंग श्री जगताप यांनी तहकूब केली व उद्या दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पुन्हा मीटिंग लावण्यात आली तरीदेखील मीटिंग च्या दुसऱ्या दिवशीही नऊ सदस्य गैरहजर होते व सरपंच पदासाठी एकमेव रिक्त जागेचा फार्म सौ रेखा बागले यांचा भरण्यात आला व त्यांना अनुमोदक म्हणून सदस्य सौ गुंताबाई गोकुळ माळी हे झाले त्यापुढे सर्व कामकाज श्री एस.बी. जगताप यांनी काम पाहिले सरपंच पदाचा एकमेव काम असल्याने सौ रेखा रमाकांत बागले यांना सरपंच म्हणून घोषित केले
यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ आणि रेखाबाई बागले समर्थक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते त्यानंतर सौ रेखाबाई बागले यांचा सत्कार श्री रमाकांत बागले यांनी केला असून त्यांच्यासोबत त्यांचे सर्व सहकारी मित्र यांनी आनंदाचे वातावरण निर्माण केले व त्यांच्या मुलाखतीतून अखेर सत्याचा विजय झाला हे उदगार काढत माझ्या पतीचे राहिले अपूर्ण स्वप्न मी पूर्ण करेल व गावाचा विकास आत बदल केल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन दिले.
आणि सर्व मेथी ग्रामस्थांच्या आभार मानले .







