त-हाडी परिसरात हार्वेस्टर गहू काढणी जोमात; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
त-हाडी प्रतिनिधी :
चालू वर्षी पावसाळा चांगला झाल्याने विहिरींना चांगले पाणी असल्याने शेतकऱ्यांन गव्हाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली गहू काढणीच्या कामाला वेग आला आहे.त-हाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर हरियाना व पंजाब या परिसरातून हे यंत्र दाखल झाली असून गहू काढणी जोरात सुरू आहे.
पारंपरिक शेती करणारा शेतकरी आता गव्हाची लवकर मळणी करण्यासाठी हार्वेस्टर मशीनचा वापर करताना दिसून येत आहे.
पूर्वी अल्प बागायती शेती असल्याने शेतीच्या कामासाठी सहज मजूर उपलब्ध होत असे. त्यावेळेस खळे पद्धत असल्याने गव्हाची कापणी केल्यानंतर तो मळणी करून काढला जात असे. कारण गव्हाची मळणी करून काढल्यावर गव्हाच्या खुटाराचा उपयोग जनावरांना चारा म्हणून केला जात असे; परंतु आता आधुनिक युगामघ्ये शेती ट्रॅक्टरच्या साह्याने केली जाऊ लागल्याने शेतकऱ्यांकडील बैलाची संख्या कमी झाली आहे. मध्यंतरी गहू काढणीसाठी विजेवर व ट्रॅक्टरवर चालणाऱ्यां यंत्रावर काढण्यात येत होती; परंतु आता बागायती शेतीत वाढ झाल्याने शेतीच्या कामासाठी मजूर उपलब्ध होत नाही.
सध्या शेतातच हार्वेस्टरच्या साहाय्याने गव्हाची काढणी केली जात असल्याने अगदी काही तासांमध्ये काढणी केली जात आहे. त्यामुळे वेळ व काढणीला लागणार खर्च पाहून एकंदरीत शेतकऱ्यांनी हार्वेस्टरला अधिक पसंती देत असून दिवसभरात आठ ते दहा एकर शेतातील गहू काढणी केली जाते, एका एकर शेतीचे सोळाशे रुपये घेत आहे.
फोटो-शिरपुर तालुक्यातील त-हाडी परिसरात हार्वेस्टरने गहु काढतांना शेतकरी