रशियन युद्धभूमीतून परतलेल्या विद्यार्थ्यांचा गंगाखेडात सत्कार
सखाराम बोबडे पडेगावकर यांचा पुढाकार
गंगाखेड प्रतिनिधी
रशिया -युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा मंगळवारी गंगाखेड रेल्वे स्टेशन वर परतताच त्यांचा सत्कार करण्यात आला. परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ् व यांच्या सहकार्यानी या कामी पुढाकार घेतला.
मरडसगाव जिल्हा परिषद मतदार संघातील विठ्ठलवाडी येथील अक्षय बालासाहेब चीलगर हा विद्यार्थी रशियामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेला होता. त्याच बरोबर रोकडोबा खंडाळी येथील अजित भोसले हा विद्यार्थी पण रशिया मध्येच गेला होता. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियन सरकारने यांना लेखी पत्र देऊन आपण मायदेशी परतू शकता असे कळविले होते. युद्धजन्य परिस्थिती, बंद करण्यात आलेली विमाने या पार्श्वभूमीवर गावी परतने अवघड होते .अशा संकटातून हे विद्यार्थी मंगळवारी सुखरूप गावी परतले. मंगळवारी सायंकाळी बँगलोर एक्सप्रेसने गंगाखेड स्टेशन आले असता यांचा परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, विक्रम बाबा इंमडे, रामेश्वर भोसले पाटील, अजित टोले आदीसह विद्यार्थ्यांचे पालक बाळासाहेब चीलगार, भोसले, लोखंडे सर आदनी त्यांचा यथोचित सन्मान केला. विद्यार्थी सुखरूप गावी परतल्याने पालकाच्या आनंदास पारावार राहिला नव्हता. रेल्वे स्टेशन वर उपस्थित प्रवाशांनीही या विद्यार्थ्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.







