• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

१० मार्च –जागतिक मूत्रपिंड दिवस

माणगंगा by माणगंगा
March 10, 2022
in महाराष्ट्र
0

@ १० मार्च @
जागतिक मूत्रपिंड दिवस

आज जागतिक मूत्रपिंड दिवस !
त-हाडी
दर वर्षी मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार ‘जागतिक मूत्रपिंड दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

सहसा लक्षणे दिसत नसल्यामुळे मूत्रपिंडाचा विकार अनेक जणांमध्ये दुर्लक्षितच राहतो. या विकाराबाबत वेळीच वैद्यकीय सल्ला घेता यावा व शक्यतो आजार उद्भवूच नये म्हणून प्रयत्न सुरू व्हावेत या दृष्टीने जागतिक मूत्रपिंड दिवस मानण्यात येतो.

लक्षणे :

मूत्रपिंडाचा विकार असलेल्या अनेक रुग्णांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे मूत्रपिंडाचा विकार लवकर लक्षात येत नाही. हळूहळू थकवा येणे, अशक्तपणा, वजन कमी होणे, भूक कमी लागणे, रात्री लघवीला जाण्यासाठी उठावे लागणे, सारखे लघवीला जावे लागणे अशी लक्षणे या रुग्णांमध्ये असतात. पण ही लक्षणे इतर आजारा मध्येही दिसू शकतात. शिवाय रुग्णाला फार काही वेगळे होत असल्यासारखे वाटत नाही, आणि त्यामुळे लक्षणे बऱ्याच जणांमध्ये दुर्लक्षित राहतात.

काही जणांमध्ये अंगावर व चेहऱ्यावर थोडी सूज येणे, लघवीचा रंग लाल दिसणे, कोरड्या उलट्या होणे अशी लक्षणेही दिसतात. ही सगळी लक्षणे मूत्र विकारांची असू शकतात व तपासण्याद्वारे त्याची खात्री करता येते. अंगावर सूज येण्यामागे काही महत्त्वाची कारणे असू शकतात. मूत्रपिंडाचा आजार, यकृताचा आजार, हृदयविकार, अॅगनिमिया (रक्तक्षय), कुपोषण, स्त्रियांमध्ये संप्रेरकांची पातळी कमीजास्त होणे यामुळे सूज येऊ शकते. त्यामुळे सुजेचे नेमके कारण कळून घेणे गरजेचे.

आजाराचा धोका अधिक कुणाला ?

मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्ण किंवा ज्यांना मूत्रपिंडाला पूर्वी जंतूसंसर्ग होऊन गेला आहे किंवा मूतखडा होता असे रुग्ण, लहानपणी मूत्रपिंड विकार झालेले वा मूत्रपिंड विकाराची आनुवंशिकता असलेले रुग्ण, या सर्वाना मूत्रपिंड विकार होण्याचा धोका अधिक असतो. त्यांनी वेळोवेळी त्या दृष्टीने तपासणी करून घेणे इष्ट.

तपासण्या कोणत्या कराव्यात ?

उच्च रक्तदाबाचा त्रास असलेले कित्येक रुग्ण बराच काळ तपासत नाहीत. रक्तदाबाची तपासणी मूत्रपिंड विकारासाठीही गरजेची असते. ज्यांना अॅेनिमिया आणि उच्च रक्तदाब हे आजार एकाच वेळी असतात त्यांना मूत्रपिंडाच्या आजाराची शक्यता वाढते. रक्त आणि लघवीच्या साध्या तपासण्या मूत्रपिंड विकारासाठी खूप महत्त्वाच्या. त्यात युरिया, क्रिएटिनिन, हिमोग्लोबिन व युरिक अॅयसिड या तपासण्या प्रामुख्याने करतात. अंगावर सूज आहे का हे पाहणेही गरजेचे.

मूत्रपिंड विकाराचा धोका असलेल्यांना लघवीची ‘एसीआर’ तपासणी (अल्ब्युमिन-क्रिएटिनिन रेशो/ युरिन मायक्रो अल्ब्युमिन) करतात. त्यातून मूत्रपिंडाच्या आजाराची शक्यता कळते. मूत्रपिंडाचा त्रास असल्याचे समजल्यावर सोनोग्राफीही केली जाते.

बालकांमध्येही मूत्रपिंड विकार शक्य :

लहान मुलांना मूत्रपिंड विकार कसा होईल असे आपल्याला वाटते. पण बालकांमध्येही तो होऊ शकतो व बऱ्याचदा त्याची कारणे आनुवंशिक किंवा जन्मजात असतात. जंतूसंसर्गामुळेही या आजाराची शक्यता निर्माण होऊ शकते. लवकर आजाराचे निदान होणे गरजेचे. बालकाला थंडी-ताप येणे, पोट दुखणे, लघवीला सारखे जावे लागणे, लघवी गढूळ होणे, चेहऱ्यावर व शरीरावर सूज येणे ही त्याची लक्षणे असू शकतात.

मूत्रपिंड विकार आणि डायलिसिस :

मूत्रपिंड विकार झालेल्या प्रत्येक रुग्णाला डायलिसिस करावाच लागतो असे नाही. परंतु या रुग्णांना त्यांना असलेले उच्च रक्तदाब व मधुमेहासारखे इतर आजार, जंतूसंसर्ग या दृष्टीने काळजी घ्यावी लागते. मूत्रपिंड विकार लवकर लक्षात आले व योग्य वैद्यकीय काळजी घेतली तर आजार नियंत्रणात राहून डायलिसिस लांबवणे शक्य होते. अनेकदा लक्षणांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे रुग्ण खूप उशिरा डॉक्टरांकडे जातात व तोपर्यंत मूत्रपिंडाच्या कार्यावर वाईट परिणाम झाल्याचे दिसून येते.

मूत्रपिंड विकाराचे प्रकार :

मूत्रपिंड विकाराचे दोन प्रकार असतात. कायमचा व तात्पुरता मूत्रपिंडविकार. तात्पुरत्या विकारात रुग्ण रुग्णालयात दाखल असेल आणि लघवीला झालेला जंतूसंसर्ग, मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो एंटेरिटिस अशा इतर गोष्टी उद्भवलेल्या असतात. अशा रुग्णाला त्या काळापुरता मूत्रपिंड विकार निर्माण होऊ शकतो व प्रसंगी डायलिसिस देखील लागू शकतो. पण तो कायमचा मागे लागत नाही. ज्या रुग्णांना ‘क्रॉनिक किडनी डिसिज’ असतो, अर्थात त्याचे मूत्रपिंड हळूहळू खराब होत गेलेले असते त्याला कायम डायलिसिस करण्याची वेळ येऊ शकते.

सर्वसाधारणपणे मूत्रपिंडाचे कार्य ५ ते १० टक्के एवढेच सुरू असेल तेव्हा डायलिसिसचा निर्णय घेतला जातो. पण हल्ली डायलिसिसच्या पद्धती सुधारल्या आहेत आणि कमी वेदनांमध्ये व पथ्य पाळून वर्षांनुवर्षे नियमित घेणे शक्य होते. मूत्रपिंडाचे कार्य ५ ते १० टक्केच उरले की त्यांना डायलिसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा पर्याय सुचवला जातो.

प्रतिबंध कसा करावा ?

इंडियन क्रॉनिक किडनी डिसिज रजिस्ट्री’ नुसार ‘किडनी फेल्युअर’च्या प्रमुख कारणांमध्ये ३३ टक्के वाटा मधुमेहाचा व १५ टक्के वाटा उच्च रक्तदाबाचा आहे. हे सारे बदललेल्या जीवनशैलीशी निगडित आहे. मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठीच्या काही साध्या गोष्टी अशा :

  • मधुमेह वा उच्च रक्तदाब असल्यास तो नियंत्रणात ठेवा.
  • घरात मूत्रपिंडाचा आजार असेल किंवा लहानपणी मूत्रपिंड विकार होऊन गेला असेल, मुतखडा, लघवीचा जंतूसंसर्ग असेल किंवा अंगावर सूज येत असेल तर प्रतिवर्षी एकदा तरी मूत्रपिंडाचे कार्य तपासून घेणे चांगले.
  • समतोल आहार घेणे व पुरेसे पाणी पिणे गरजेचे.
  • वजन वाढू देऊ नका. स्थूलता असेल तरीही मूत्रपिंडावर ताण येऊ शकतो. नियमित व्यायामाने वजन नियंत्रणात ठेवता येईल.
  • धूम्रपान उच्च रक्तदाब व मूत्रपिंड विकार या दोन्हीच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे. त्यामुळे धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहणेच बरे.
  • अनेक जण स्वत:च्या मनाने डोकेदुखी, पाठदुखी यासाठी दीर्घकाळ वेदनाशामक गोळ्या घेतात. अ‍ॅसिडिटीसाठीही लोक वर्षांनुवर्षे विशिष्ट गोळ्या घेतात. या औषधांमुळेही मूत्रपिंडावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे औषधे घेणे टाळावे.

डॉ. अभय हुपरीकर, मूत्रपिंड विकारतज्ज्ञ

Views: 176
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
दाऊदच्या दबावामुळे नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा नाही- भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचा गौप्यस्फोट

दाऊदच्या दबावामुळे नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा नाही- भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचा गौप्यस्फोट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)