• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

उन्हाळ्याची चाहूल लागताच वाजु लागले रसवंती गृहाचे घुगंरु

माणगंगा by माणगंगा
March 10, 2022
in महाराष्ट्र
0
उन्हाळ्याची चाहूल लागताच वाजु लागले रसवंती गृहाचे घुगंरु

उन्हाळ्याची चाहूल लागताच वाजु लागले रसवंती गृहाचे घुगंरु

त-हाडी
ललिता खोंडे
;-उन्हाळ्याची चाहुल लागताच त-हाडी परीसरातिल ग्रामीण भागात सर्वत्र शीतपेयाची दुकाने थाटली आहेत. मात्र,जोपर्यंत उन्हाचे चटके जाणवत नाही तोपर्यंत ग्राहक वळत नाही असे चित्र निर्माण होत असेत परंतु गेल्या आठ दिवसापासून अचानक तापमानात मोठी वाढ झाली असून नागरीक थंड शीतपेय, व रसवंती गृहाकडे वळु लागले आहेत.उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असली, तरी उघड्यावर शीतपेये आणि रसवंतीगृह विक्री करणारे विक्रेत्यांचे थोड्याफार प्रमाणात अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे.

कामानिमित्त घराबाहेर पडणार्यांना उन्हाच्या तडाख्यात ही शीतपेये,रसवंतिगुहे दिलासादायक वाटत आसल्यामुळे या शीतपेयांना व रसवंती गृहामध्ये ग्राहकांची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे.फुल गलास रस दहा रू मध्ये मिळत असल्याने मोठी गर्दि या ठिकाणी होताना दिसत आहे.थंड पाणी, कोल्ड्रिंक्स, उसाचा रस, मठ्ठा, ताक, लस्सी, सरबत, ज्यूस, आईस्क्रीम, रसवंती, बर्फगोळा, कुल्फी, फळे, फळांच्या फोडी, सॅलड, भेळपुरी, पाणीपुरी, शेंगदाणे, चाट आशा वेगवेगळ्या प्रकारच्या फळाने,व रंगाने दुकाने थाटली आहेत फेब्रुवारी-मार्च महिन्यात उन्हाचे चटके कमी जाणवत आसतात तरी तापमान कमी आसताना सुध्दा रसवंतिगुह आणि शीतपेयाच्या दुकानाना गर्दी दिसून येत आहे.

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झपाट्याने कमी होत असते. त्यामुळे शरीराला ऊर्जा व तहान भागविण्यासाठी आता सरबत, उसाचा रस, आईस्क्रीम, कुल्फी, लिंबू-सरबत यांसारख्या थंड पदार्थांची दुकाने थाटलेली दिसत आहेत.सध्या थंडपेयांना मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक पेयांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

आईस्क्रीमचे विविध प्रकार.
उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे नागरिक आईस्क्रीम खाणे जास्त पसंत करतात. बाजारात विविध प्रकारचे म्हणजेच काजू, पिस्ता, केशर, व्हॅनिला, हिरामोती, गुलकंद, पानमसाला, अमेरिकन ड्रायफ्रूट यासारखे आईस्क्रीम उपलब्ध आहे. लहान मुलांना फळांचे व चॉकलेटचे आईस्क्रीम पसंत असल्यामुळे संध्याकाळच्या सुमारास नागरिक परिवारासोबत जाऊन आईस्क्रीमचा आनंद घेताना दिसून येत आहेत. हे आईस्क्रीम १० ते ५० रुपयांना मिळते.

थंडगार लिंबूसरबत,
नूकतेच लग्नसराई सुरू झाल्यामुळे लग्नात मठ्ठा, ताक, तसेच लिंबूसरबत मोठ्या प्रमाणावर तयार केले जाते. पाणी पिण्यापेक्षा लोक जास्तीत जास्त लिंबूसरबत पितात. अनेक ठिकाणी मठ्ठा व जलजिराच्या गाड्या लावण्यात आल्या आहेत. साधारणपणे १० रुपये ग्लास मिळणारा हा जलजिरा सर्वांनाच आवडतो. महाविद्यालय, शाळा, मंगल कार्यालय या भागांमध्ये या गाड्या दिसतात.

बर्फगोळा लोकप्रिय;–
उन्हाळ्यात बच्चे कंपनीला बर्फाच्या गोळ्याचे भलते आकर्षण असते. विविध रंग, चवींत उपलब्ध असलेला गोळा ज्येष्ठांमध्येही लोकप्रिय आहे. साधा गोळा, मावा गोळा, आईस प्लेट यांसारखे प्रकार यात उपलब्ध आहे यामुळे आईस्क्रीम पार्लरची संख्या वाढली आहे. तरीही बर्फगोळ्याचे महत्त्व अद्याप टिकून आहे. बर्फाचा गोळा घेण्यासाठी लहान मुले गाड्यांभोवती गर्दी करीत असल्याचे दिसून येते. गोळ्यांच्या दरात वाढ झाली आहे.

ज्यूसला मागणी–
परिसरात ज्यूसची दुकाने लावण्यात आली आहे. विविध प्रकारचे सरबत याठिकाणी उपलब्ध आहे. चॉकलेट शेक, कोल्ड कॉफी, लिंबू सरबत, रोझ मिल्कशेक, तसेच अननस, स्ट्रॉबेरी, चिकू, सफरचंद, संत्री या फळांच्या ज्यूसची मागणी वाढली आहे. हे सर्व प्रकारचे ज्यूस साधारणपणे १० ते ४० रुपये किमतीपर्यंत उपलब्ध आहेत. अन्य शीतपेयांच्या तुलनेत उसाचा रस स्वस्त व मस्त असल्याने त्याला या दिवसांत अधिक मागणी दिसून येते.

चौकट-
सकाळी ११पासूनच उन्हाच्या झळा लागू लागतात. दुपारनंतर तर उष्णता असह्य होते. शरीरातील पाण्याची कमी भरून काढण्यासाठी थंडपेयांचा आधार घ्यावा लागतो. काही क्षणांसाठी का होईना शीतपेये आराम देतात.

  • राजेंद्र बोरसे ग्राहक.

चौकट-
विशेषत:संध्याकाळी रस पिण्यासाठी अधिक गर्दी असते. दुपारी अधिक ऊन असल्याने बहुतेक लोक घराबाहेर, कार्यालयाबाहेर पडायचे टाळतात. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडलेले असतात. तसेच बसथांब्यावरही गर्दी कमी असते.

सागर पाटील, ज्यूस विक्रेता,वरूळ

चौकट- मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढत जाईल तसतसे ग्राहक वाढत जाईल असे वाटते या कोरोणा परिस्थिती मुळे लग्न सराई कमी प्रमाणात असुन ग्राहकाचु संख्या असमाधानकारक दिसुन येत आहे.त-हाडी मध्ये दहा रसवंतीगुह आहे. मात्र आम्ही जास्त विक्री कमी नफा तत्वावर ग्राहकांना 10 रु देत आहोत त्यामुळे सर्वसामान्य नागरिक दुकानावर आकर्शित होत आहेत.

समाधान पाटील जवखेडा – सोडा & रसंवती गृह चालक.

फोटो कँप्शण-एका मध्ये ज्युस विक्रेता दिसत तर दुसऱ्या छायाचित्रात रसंवती गृह दिसत आहे.

Views: 218
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
शेगावात नाभिक समाजाचे द्वितीय साहित्य संमेलन.

शेगावात नाभिक समाजाचे द्वितीय साहित्य संमेलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)