नैसर्गिक रंगाची बिनधास्त खेळा होळी.
रासायनिक रंगामुळे होऊ शकते डोळ्याला व त्वचाला इजा.
त-हाडी
अलीकडे बाजारात मिळणाऱ्या भडक व रासायनिक रंगामुळे त्वचा आणि डोळ्यांना बाधा होण्याची शक्यता आहे.शिवाय पर्यावरणपुरक रंगांनी होळी साजरी करावी असे आवाहन पर्यावरप्रेमी करीत आहेत.
पर्यावरणपुरक रंगोत्सव साजरा करण्याचा कल वर्षानुवर्षे वाढत आहे.त्यादृष्टीने जनजागृतीही होत आहे.त्यामुळे अंधत्व,दमा,कर्करोगाला,निमंत्रण देणाऱ्या अत्यंत घातक रासायनिक रंगाकडे सर्वानी पाठ फिरवुन नैसर्गिक रंग खेळावेत असे आवाहन रासयनतज्ज्ञ,डॉक्टर,करीत आहेत. पाणी टंचाईचे सावट लक्षात घेता पाण्याचा अपव्यय न करता कोरड्या रंगानी होळी खेळावी असेही आवाहन पर्यावरणप्रेमी करतात.
यापासुन बनवा रंग
पारिजात,पळसाची फुले,आवळा,बीट,हळद,गुलमोहर,मेंदी,जांभुऴ आदी नैसर्गिक घटकांकडुन घरच्या घरी ओले व कोरडे रंग बनवुन वापरावे असे आवाहन विविध संस्थांना कडुन करण्यात येत आहे.
……….चौकट…
रासायनिक रंगामुळे आपल्या अवयवांना इजा होवु शकते.दुसरी कडे दुष्काळाची दहाकता बगता पाण्याचा अपवाद टाळण्यासाठी कोरड्या रंगाची होळी सजारी करावी.
डॉ शशिकांत पाटील, त-हाडी







