जागतिक चिमणी दिवस
त-हाडी :- दरवर्षी वीस मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षीही हा दिवस जगभर साजरा केला जाणार आहे. चिमणी या चिमुकल्या पैशासाठी व त्याच्या संरक्षणासाठी हा दिवस साजरा केला जातो. झपाट्याने कमी होणारी चिमण्यांची संख्या लक्षात घेऊन 20 मार्च जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो.

तसेच येणाऱ्या पिढीला चिमणी हा पक्षी माहीत असावा या उद्देशाने हा दिवस चिमणी दिवस म्हणून घोषित करण्यात आला भारतात सर्वात जास्त माहित असणारा पक्षी म्हणून चिमणी परिचयाची आहे पूर्वी गल्लीबोळात, बाल्कनीत, गच्चीवर, झाडावर दिसणाऱ्या व मानवी वस्तीत मुक्त संचार करणाऱ्या चिमण्या दिसेनाशा झाल्या आहेत. अन्य पशु पक्षाप्रमाणे चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सहा महिन्यातून एकदा दोन चार अंडी घालणाऱ्या चिमण्यांना मिलन काळात मातीची गरज असते. पण आज मातीची जागा सिमेंट ने घेतली आहे. सिमेंटच्या जंगलामुळे व वाढत्या वृक्षतोडीमुळे चिमण्यांचा अधिवास नष्ट झाला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

विशेषता शहरांमध्ये मोबाईल टॉवरमधून होणारे विद्युत चुंबकीय उत्सर्जन, आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या जाग्याची अनुपलब्धता, अन्नाची उपलब्धता, शहरांमधील वाढते प्रदूषण तसेच शेतात होणारा रासायनिक खते व कीटकनाशक यांचा बेसुमार वापर यासारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. वीस मार्च हा दिवस चिमण्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी साजरा केला जातो. चिमण्यांची घटती संख्या अशीच कायम राहिली तर येणाऱ्या पिढीला चिमणी केवळ पुस्तकाचा चित्रा मधूनच पाहता येईल.
पक्षी हा मानवी जीवनातील अविभाज्य घटक आहे. सकाळी आपल्याला झोपेतून उठवणाऱ्या कोकळे पासून चिमण्यांचा किलकिलाट पर्यंत सर्व पक्षी आपला सारा दिवस आनंदात जावा. यासाठी आपल्या कानावर आणि मनावर नादमधुर संगीताचे स्वर उमटत असतात. तसे हिरवीगार झाडे बघून मन प्रसन्न होते तसेच पक्षामुळे मन आनंदी होते. त्यासाठी पक्षांचे अस्तित्व टिकवणे महत्त्वाचे त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घराच्या गच्चीत, बाल्कनीत, छपरावर कृत्रिम घरटी ठेवावी. त्यात ज्वारी, बाजरी, गहू यासारखी धान्य ठेवावीत. बाल्कनीत, गॅलरीत मातीच्या भांड्यात पाणी ठेवले असता ते चिमण्यांना पिण्यास मिळेल व त्यांना उन्हाळ्याची झळ बसणार नाही. केवळ चिमणी दिवस साजरा करून चिमण्या परत येणार नाहीत याचा विचार व्हावा.







