बामखेडा महविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराचे आज उद्घाटन
त-हाडी
ग्रामविकास संस्थेच्या कला महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात येणारे मौजे त-हाडी त.त.येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रम संस्कार शिबीराचे दि.22/03/2022 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी.पाटील याच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमसाठी गावातील माजी सैनिक श्री प्रकाश वेडू पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त व प्रथम लोकनियुक्त सरपंच जयश्री सुनील धनगर , राष्ट्रीय सेवा योजनेच्या सल्लागार समितीचे सदस्य श्री तुळशीराम भाईदास भामरे तसेच गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन होणार आहे
.दि.22/0/2022 ते 27/03/2022 पर्यंत या शिबिरात प्रत्येक दिवसी दोन वक्ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यात दि.22/03/2022 तारखेला ह. भ. प. श्री अनिल पाटीलसर वसमाने हे-” राष्ट्रीय सेवा योजना एक संस्कार शाळा” तसेच श्री विठ्ठल सुदाम मराठे- “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत दि.23/03/ 2022 रोजी श्री कैलास मधुकर पाटील-
” ग्रामविकासात युवकांची भूमिका” आणि श्री प्रमोद तुकाराम परदेशी “भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे ” या विषयावर बोलणार आहेत दि. 24/03/ 2022 रोजी श्री कृष्णा छगन कोळी माजी फौजी ” देश सेवा एक कर्तव्य” तसेच श्री युवराज एम. जाधव “अवयव दान श्रेष्ठ दान “या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत दि.25/03 /2022 रोजी डॉ. धीरज आर अहिरे ” एड्स जाणीव आणि जागृती” आणि अँड. गायत्री दिलीप पाटील” महिला आणि कायदे” या विषयावर बोलणार आहेत
.दि.26/03 /2022 रोजी श्री ज्ञानेश्वर सुरेश भामरे “राष्ट्रीय सेवा योजना आणि नेतृत्व ” आणि श्री सुरेश मोतीलाल आहिरे ” डिजिटल साक्षरता ” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.दि.27/03/2022 रोजी श्री विजय नवल सावळे माजी फौजी “जय जवान जय किसान एक मंत्र” या विषयावर बोलणार आहेत. तसेच त्यांच्या बरोबर श्री रमेश जायनाकर हे “उच्च शिक्षणातील करिअरवाटा ” या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत.
त्याचप्रमाणे दि.28/03 2022 रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री दादासाहेब पी.बी. पटेल तसेच उपाध्यक्ष डॉ. के.एच. चौधरी तसेच सचिव आप्पासाहेब बी. व्ही चौधरी ,संचालक श्री के.बी.चौधरी चौधरी व डॉ. विजय पाटील नंदुरबार जिल्हा समन्वयक ,डॉ. राजेंद्र दगडू मोरे शहादा विभागीय समन्वयक या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या श्रम संस्कार शिबीराची सांगता करण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सी.एस. करंके तसेच सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. वाय.सी. गावित, सर महिला कार्यक्रम आधिकारी डॉ. के. पी. पाटील यांनी शिबिराचे नियोजन कलेले आहे. या शिबिरात विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत
1) बेटी बचाव बेटी पढाव 2) परिसर स्वच्छता 3) वित्तीय साक्षरता 4) एक मुक्त धान्य संकलन 5) जलसंवर्धन 6) व्यसनमुक्ती जनजागृती 7) कोविळ संसर्ग लसीकरण असे विविध उपक्रम मौजे त-हाडी गावात घेतले जाणार आहेत. असे कार्यक्रम आधिकारी डॉ. सी.एस करंके त्यांनी सांगितले.