• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

“जी. टी. पाटील महाविद्यालयात संगीत व वाद-विवाद कौशल्य कार्यशाळा संपन्न”

माणगंगा by माणगंगा
March 21, 2022
in महाराष्ट्र
0
“जी. टी. पाटील महाविद्यालयात संगीत व वाद-विवाद कौशल्य कार्यशाळा संपन्न”

“जी. टी. पाटील महाविद्यालयात संगीत व वाद-विवाद कौशल्य कार्यशाळा संपन्न”


—————————————-

त-हाडी


कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग व जी. टी. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय “संगित कौशल्य व वादविवाद कौशल्य” कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.


संगीत कौशल्य कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे समन्वयक माजी प्राचार्य डॉ. एम एस रघुवंशी तर वादविवाद कौशल्य कार्यशाळा उद्घाटन उपप्राचार्य डॉ.एम जे रघुवंशी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस श्रीवास्तव होते .


दोन दिवस चालणाऱ्या या दोन्ही कार्यशाळांमध्ये विद्यापीठाने विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवून त्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने ज्या वेगवेगळ्या कार्यशाळा महाविद्यालयांना दिल्यात त्यातील संगीत कौशल्य आणि वाद-विवाद कौशल्य हे दोन्ही कौशल्य विकसित होणे अत्यंत महत्त्वाचेआहे. विद्यापीठाच्या युवारंग महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांची या माध्यमातून जणू पूर्वतयारीच झाली असे उद्घाटन सत्राच्या माध्यमातून या दोन्ही मान्यवरांनी आपले विचार मांडले. “संगीत कौशल्य “कार्यशाळेत संगीत शिक्षक हेमंत पाटील यांनी ‘संगीत आणि जीवन ‘या विषयाचे महत्व पटवून देताना संगीत कला आत्मसात करण्यासाठी हार्मोनियम ,बासरी आणि ढोलक वादनाच्या प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. यावेळी त्यांना महेंद्र राजपूत ढोलक वादक म्हणून सहकार्य लाभले .तर दुसऱ्या सत्रात जी. टी. पाटील महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक ,आदिवासी लोककलेचे अभ्यासक डॉ. मनोज शेवाळे यांनी ‘आदिवासीचे लोकसंगीत व लोककला यावर अभ्यासपूर्ण मांडणी केली .सोबत ज्योती महाराज बंधारपाडा, बकाराम चौरे ,व नथू जगताप यांच्याकडून पावरी वाद्य ,घोडा काठी , ढाक या वाद्यांची ओळख व प्रात्यक्षिके करून घेतली.


दुसऱ्या दिवशी ‘वादविवाद कौशल्य ‘कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पहिल्या सत्रात नंदुरबार येथील महिला महाविद्यालयातील ग्रंथपाल श्रीराम दाउतखाने यांनी वक्तृत्व कलेचा विकास ,भाषण कौशल्य या संदर्भात विचार मांडलेत तर दुसऱ्या सत्रात तळोदा महाविद्यालयातील प्रा.जयपाल सिंग शिंदे यांनी वक्तृत्व वादविवाद कलेसाठी आवश्यक असणारे साहित्यिक गुणांवर विस्तृत चर्चा केली .


या दोन्ही कार्यशाळांचे आयोजन विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाअंतर्गत ,विद्यार्थी विकास अधिकारी व रासेयोचे माजी जिल्हा समन्वयक डॉ. माधव कदम ,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.रुपेश देवरे ,महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.जयश्री नायका यांनी केले होते.दोन्ही दिवस सूत्रसंचालन व प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. माधव कदम यांनी केले तर आभार डॉ. रुपेश देवरे आणि प्रा.जयश्री नायका यांनी मानलेत. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी डॉ. मनोज शेवाळे, हरीश पाटील, सागर साठे, राम ठाकूर ,नरेंद्र मोरे ,राहुल पवार ,राहुल सोनार ,योगेश पावरा, योगेश रतिलाल पावरा, सुमेध बर्डे , धनराज पवार, प्रथमेश पाटील यांचे सहकार्य लाभले.

Views: 559
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सदर क्रमांक:-004……….महाराष्ट् ओनरशिप फ्लॅटस् कायदा

सदर क्रमांक:-006....महाराष्ट् ओनरशिप फ्लॅटस् कायदा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)