• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

स्वातंत्र्य लढ्यातील हजारो उपेक्षित क्रांतिकारकांचा प्रेरणादायी इतिहास नवीन पिढीसमोर आणणे आवश्यककॉम्रेड मारुती शिरतोडे

माणगंगा by माणगंगा
March 30, 2022
in महाराष्ट्र
0
स्वातंत्र्य लढ्यातील हजारो उपेक्षित क्रांतिकारकांचा प्रेरणादायी इतिहास नवीन पिढीसमोर आणणे आवश्यककॉम्रेड मारुती शिरतोडे

स्वातंत्र्य लढ्यातील हजारो उपेक्षित क्रांतिकारकांचा प्रेरणादायी इतिहास नवीन पिढीसमोर आणणे आवश्यक
कॉम्रेड मारुती शिरतोडे

भारताचा स्वातंत्र्यलढा हा जगातील एक प्रदिर्घकाळ चाललेला रोमहर्षक स्वातंत्र्यलढा असून या स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिलेल्या हजारो उपेक्षित क्रांती विरांच्या कार्याचा प्रेरणादायी इतिहास नवीन पिढीसमोर आणणे आवश्यक आहे असे आग्रही मत इतिहास अभ्यासक कॉम्रेड मारुती शिरतोडे यांनी आज रामानंदनगर तालुका पलूस येथे केले व्यक्त केले.

क्रांती अग्रणी डॉ.जी डी बापू लाड जन्मशताब्दी वर्ष व भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष यानिमित्त आयोजित आचार्य शांताराम बापू गरुड प्रबोधन व्याख्यान मालेतील तिसरे पुष्प गुंफताना ते प्रमुख वक्ते म्हणूंन बोलत होते. अध्यक्षस्थानी पुरोगामी विचारवंत भाई व्ही.वाय.(आबा)पाटील होते.” भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील उपेक्षित क्रांतिकारकांचे योगदान” या विषयावर बोलताना कॉम्रेड मारुती शिरतोडे म्हणाले की आपल्या देशाचा स्वातंत्र्यलढा हा चार टप्प्यात लढला गेला असून या लढ्यात झालेले साडेतीन लाख हुतात्मे तर हजारो लाखोनी भोगलेला कारावास,भूमिगत राहून देशासाठी काम करत, महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. परंतु या सर्वांचेच कार्य इतिहासाच्या पाना पानात आलेले नसून उपेक्षित क्रांतिकारकांच्य कार्या चा इतिहास नवीन पिढी समोर आणणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक, संगोळी रायान्ना, कित्तूरची राणी चन्नम्मा, राजगुरू, सुखदेव ,जतींद्रनाथ दास,क्रांतीवीर वीर सिंदूर लक्ष्मण ते चलेजाव चळवळीच्या लढ्यात मोठी कामगिरी केलेले सांगली जिल्ह्यातील सांगलीच्या जेलफोड आंदोलनातील क्रांतिकारकांचे कार्य,बिळाशी जंगल सत्याग्रहातील क्रांतिकारकांचे कार्य ,1857च्या उठावातील हुतात्मा झालेला कुंडलचा नाना रामोशी ते महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीतील तात्याबा रोडे,धोंडीबा कुंभार, सावित्रीबाई रोडे रामोशी अशा उपेक्षित क्रांतिकारकांच्या जीवावर उदार होऊन केलेल्या कार्याचा परिचय त्यांनी आपल्या ओघवती भाषणात करून दिला. सांगली जिल्ह्यातील चलेजाव चळवळीतील 3 सप्टें.1942 च्या तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चा,10 सप्टे.1942 चा इस्लामपूर मोर्चातील क्रांतिवीरांचा धाडशी सहभाग व जत तालुक्यातील वीर सिंदूर लक्ष्मण चा स्वातंत्र्यलढ्यातील रोमहर्षक सहभाग सांगून सध्या सिंधूरला होणाऱ्या त्यांच्या स्मारक,पुतळ्यास आमदार अरुण लाड करीत असलेली भरीव मदत त्यांनी सांगितली.उपेक्षित क्रांतिकारकांचे कार्य हे खूप मोलाचे कार्य असून जरी ते इतिहासाच्या पानावर आले नसले तरी नवीन पिढीला ते निश्चितपणे दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरेल अशा स्वरूपाचे भरीव कार्य आहे यावर त्यांनी भर दिला.

या व्याख्यानमालेचे स्वागत प्रास्ताविक प्रा.आदम पठाण सर यांनी केले तर आभार प्रा. रवींद्र येवले यांनी मानले. प्रारंभी थोर स्वातंत्र्य सेनानी समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक आचार्य शांताराम बापू गरुड यांच्या प्रतिमेस प्रमुख वक्ते कॉम्रेड मारुती शिरतोडे ,पी.के.माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या व्याख्यानमालेस दीपक घाडगे,हिम्मतराव मलमे,बाळासाहेब खेडकर,पद्माकर मिठारी,संतोष खेडकर,अनिल सोळवंडे,प्राचार्य तानाजीराव चव्हाण, प्रा.उत्तमराव सदामते,संपतराव गायकवाड,,संभाजी सदामते,विशाल नावडकर,उत्तम सुतार,महेश जाधव, पाटील,विष्णू रोकडे,अरविंद साठे,विजय कोडग,ए.बी.सागरे,पिरजादे,शौकत पठाण,मुकूंद खारगे,शिवाजीराव इंगळे,जनार्दन पाटील,आशिफ नदाफ,अन्सार शिकलगार, टि.जी.अनुगडे सह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views: 450
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
दलाई लामा यांना भारतरत्न प्रदान करण्यासाठी मतदान मोहीम !रविराजे उपाध्ये, रायपूर, छत्तीसगड,

दलाई लामा यांना भारतरत्न प्रदान करण्यासाठी मतदान मोहीम !रविराजे उपाध्ये, रायपूर, छत्तीसगड,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)