रखरखत्या ऊन्हात सौ यमुनाबाई भोई ह्या
हरभरे , शेंगदाणे भाजुन चालवीतात,
कुटुंबांचा उदरनिर्वाह–
त-हाडी प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील भोई समाजातील सौ यमुनाबाई भाईदास भोई ह्या आज रोजी आपल्या अक्कल हुशारी हारभरे शेंगदाणे भाजुन जवळपास कुटुंबातील चार लोकांचा उदरनिर्वाह चालवीते संध्या मोल मजुरीची कामे नसल्यामुळे
हातला काम नाही.
त्यामुळे यमुनाबाई भोई यांनी हरभरे शेंगदाणे भाजुन देण्याच्या व्यवसाय सुरू केला आहे.
सदर व्यवसाय हा जवळपास दोन महिने चालतो व
यातुन त्यांना दैनंदिन कधी पाचशे रुपये, सातशे ,तर कधी हजार रुपये, रोज पडतो त्यावर सौ यमुनाबाई भोई यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवतो याबाबत सदर प्रतिनिधी यांनी त्यांना विचारले असता तर त्यांनी सविस्तर माहिती दिली ती अशी की जी माता भगिनी माझ्याकडे हरभरे भाजुन घेते त्यांच्या कडुन मी तीस रुपये किलो प्रमाणे भाजन्याचे मजुरी प्रमाणे पैसे घेते सदर भाजण्यासाठी सदरील ग्रहांच्या कडुनच अल्पशे पाणी,मिठ,जळतंन (इंधन)
घेतले जाते व नंतर नदी पात्रातील केळ वाळु कढाईत टाकून भंट्टी वर सदरील हारभरे शेंगदाणे भाजुन फुटाणे तयार केले जातात व ते अतिशय खाण्यासाठी चविष्ट लागतात कारण त्या मध्ये मिठ असल्यामुळे खारट लागतात त्यामुळे कोणी चार किलो,तर कुणी दहा किलो ,ज्याच्या त्याच्या मना नुसार भाजुन घेतात.
चांगले तर फुटाणे भाजावयाचे असल्यास हरभरयात अनेक जाती आहेत परंतु विशाल जातीचे हरभरयाचे चांगले फुटाणे तयार होतात असे सौ यमुनाबाई भोई म्हणाल्या
खरंतर भोई समाज बांधवांनचा जातिवंत व्यवसाय आहे .
परंतु अलीकडे अनेक किराणा मालाच्या दुकानात दोनशे रुपये प्रमाणे फुटाणे मिळतात परंतु गरम व ताजे फुटाणे मिळत नाही.
परंतु सौ यमुनाबाई भोई यांच्या कडे फक्त तीस रुपयात एक किलो हरभरे शेंगदाणे भाजुन मिळतात संध्या तर त्यांच्या कडे हरभरे शेंगदाणे भाजुन घेण्यासाठी चांगलीच गर्दी असते .
भोई समाज बांधवांनाचा मंछ्छीमारी करणे ,मंछ्छीविकणे, व उन्हाळ्यात धरण, तलाव व मोठ्या नदीच्या पात्रात गाळपेरात वाड्या लावतात त्यातुन देखील खरबूज, टरबुज,काकडी,खिरा ,फळे विकुन आपल्या पिढीजात व्यवसाय आज ही करतात व त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून आपले कुटुंब चालवीतात व तेवढेच नाही तर यात्रा उत्सव बाजारात शेव चिवडा,दाळी,रेवडी, लाहे, फुटाणे, देखील विकणात तर होळी पौर्णिमेच्या सनात देखील साखरीच्या पाका पासुन गाठी, व लहान लहान मुलांच्या हातातील गोल (गोड) कडे देखील विकतात असे अनेक व्यवसाय भोई समाज बांधव आजही करतात परंतु आता काही समाज बांधव आता भाजी पाले या व्यवसायाकडे वळाले आहे.
अशी माहिती सौ यमुनाबाई भाईदास भोई यांनी सहज बोलताना सदर प्रतिनिधीशी बोलताना दिली….







