तऱ्हाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक बिनविरोध
तऱ्हाडी:- येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता त्यात १३जागामध्ये आठ सर्व साधारण.एक अनुसूचित जाती जमाती.दोन महिला प्रतिनिधी एक भटक्या विमुक्त जमाती व एक इतर मागासवर्गीय या जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता
दिनांक सहा एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने त्याच दिवशी तेरा जागांसाठी तेरा उमेदवार अर्ज संजय शांतीलाल पाटील.शिवाजी निंबा पाटील.प्रकाश वगर पाटील.दादाभाई रामदास भिल.शशीकांत नामदेव पाटील.सुभाष खुशाल पाटील.ज्ञानेश्वर बन्सीलाल पाटील.सुनिल विनायक पाटील हे सर्व साधारण जागा साठी व जयश्री रावसाहेब चव्हाण.बेबीबाई नथा न्हावी हे महिला प्रतिनिधी .प्रा.प्रशांत दंगल पाटील इतर मागासवर्गीय या साठी प्रा उदय कुमार सुदाम भलकार भटक्या विमुक्त जमाती साठी व दिलीप गंभीर अहिरे अनुसूचित जाती साठी यांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय शिरपूर येथे दाखल करण्यात आले
सहा एप्रिल ही अंतिम तारीख असल्याने यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी बी डी पाटील व सचीव सुधाकर विसपूते यांनी तऱ्हाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असे जाहीर केले ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी शालेय शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल.आमदार काशिराम पावरा.जि.प.अध्यक्ष डॉ.तुषार रंधे. नगरसेवक प्रभाकर चव्हाण.राहूल रंधे अशोक कलाल.माजी सरपंच सुदाम भलकार.मा.उपसरपंच ओंकार पाटील ग्रामपंचायत सदस्य किरण भलकार पिक संरक्षण सोसा.चेअरमन अनिल करंके सोसायटी बिनविरोध करण्यासाठी सहकार्य लाभले







