तऱ्हाडी येथे श्रीराम मंदिर व हनुमान मंदिर पुर्नप्राणप्रतिष्ठा व ग्राम-शांती महापुजा आयोजन
त-हाडी :- शिरपुर तालुक्यातील त-हाडी येथे प्रभु श्रीरामांच्या नवीन मूर्तीची स्थापना अन् प्राणप्रतिष्ठापना व पवनपुत्र हनुमंतरायाची पुर्नप्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. तसेच संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या नवीन मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे त्यामुळे संपूर्ण त-हाडी परिसर पंचकृषीसह भक्तिमय झाला आहे़. त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
दि. ११-०४-२०२२ रोजी मुर्तींचा प्राण संकलन विधी.
दि. १४-०४-२०२२ रोजी पुजा मंडप व पुजा स्थान आखणी.
शुक्रवार दि. १५-०४-२०२२ रोजी सकाळी ९ वा. श्रींची शोभायात्रा, प्रायश्चित्त विधान, गणेश पुजन, मंडप पुजन व प्राणप्रतिष्ठा प्रयोग प्रारंभ होईल. संध्याकाळी ६.३० वा. आरती. प्रथम मुर्ती संस्कार – जलाधिवास.
शनिवार दि. १६-०४-२०२२ रोजी सकाळी ९ ते १२ आवाहित देवता प्रात:पुजन – अरणीमंन्थन पुर्वक अग्निप्रदीपण स्थापना. ग्रहस्थापन – मुर्ती द्वितीय संस्कार – धान्यादिवास, न्यास, मंदिर स्नपन, संध्याकाळी ६.३० वा. आरती, तृतीय संस्कार – शय्याधिवास.
व हनुमान जयंती निमित्त रात्री ९ वाजता चंद्रकांत महाराज अर्थेकर यांचे कीर्तन.
रविवार दि. १७-०४-२०२२ रोजी सकाळी ९ ते १२ मुर्तींचा महाभिषेक, मंदिर स्थान भूमीपूजन, मूर्तींची सुलग्नावर प्राणप्रतिष्ठा – स्थापना – मुर्ती श्रृंगार, प्रधान हवन, उत्तरांग हवन, विशेष हवन, अत्तर पुजन, बलिदान.
पूर्णाहुति – महानैवद्य समर्पण – महाआरती.
सोमवार दि. १८-०४-२०२२ रोजी सकाळी ९ वाजेपासून महाप्रसाद (भंडारा)
प्राणप्रतिष्ठा :
भागवताचार्य अविनाश जोशी व सोबत ५ महाराज अन् त्यात एक ब्रम्हचारी महात्मा व ग्रामाचार्य राजेंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे.
सदर कार्यक्रम संपुर्ण गावातील नागरिकांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे अन् त्यात श्रीराम मंदिर स्वयंसेवक समिती तऱ्हाडी ने सर्व जबाबदारी स्वीकारली आहे.
स्वयंसेवक म्हणून नानासो रघुनाथ मिस्तरी, दौलत चतुर भामरे, आधार दशरथ कोळी, पंडीत गैंधल पाटील, प्रमोद छबुलाल पाटील, रामदास रोहिदास पाटील, कृष्णा किसन पाटील हे कार्यरत आहेत.
दिनांक १८ एप्रिल रोजी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर स्वयंसेवक समितीने व त-हाडी येथील ग्रामस्थांनी केले आहे.







