त-हाडी परिसरात पंखे व कुलरच्या किंमतीत वाढ ‘थंडी हवा’ महागणार
*त-हाडी*
शिरपूर तालुक्यात व त-हाडी परिसरात एप्रिल महिना उजाडला असून दुपारच्या वेळी उन्हामुळे अंगाची लाही लाही होतं आहे. त्यामुळे पत्राच्या घरात राहत असणारे नागरिक दुपारच्या वेळी कडक पडणाऱ्या ऊन्हा पासुन बचाव करण्यासाठी व घरात गारवा राहावा याकरीता फ्रीज, कुलर, एसी असे अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेतात. मात्र, आता कृत्रिम हवा नागरिक चांगलीच महागली असून कुलरची मागणी वाढली आहे. मात्र यंदा लोखांडाच्या दरात मोठी वाढ झाली असल्याने कुलरच्या दरातही १५ ते २५ टक्याने किंमतीत वाढ झाली असल्याचे पाहावयास शिरपूर मधे मिळत आहे.
दोन वर्षापासून आधीच कोरोनाच्या काळात लोकांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. हातचे काम धंदे गेले होते.त्यातच आता युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये तांबे आणि अँल्युमिनियचे भाव गगनाला भिडले असल्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या किंमती वाढल्या आहेत. कच्च्या मालातील वाढ आणि अन्य कारणांमुळे इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी यापूर्वीही तीनवेळा दरवाढ केली आहे. त्यातच आता या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किंमती मध्ये पुन्हा एकदा वाढ आहे.
बाजारात विक्रीसाठी आलेले कुलर
“”मागील दोन वर्षात कोरोणामुळे दुकाने बंद राहिल्या. यावर्षी वाटलं बरा राईल तर त्यात कुलर सह इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये दरवाढ झाली. त्यामुळे सध्या ग्राहक नसल्याने माल खरेदीत गुंतवणूक केलेले पैसेही निघते का नाही असा प्रश्न आमच्या समोर आहे.
मुन्ना पाटील