वाडी शेवाडी धरणाचे पाणी पाटली नदीत सोडावे प्रकाश पाटील*
================================
डोंगरगाव (प्रतिनिधी )आर आर पाटील==
शिंदखेडा तालुक्यातील वाडी शेवाडी येथील धरणाचे पाणी सवाई मुकटी गावा जवळील पाटचारी तून पाटली नदी शेजारून वाहते सवाई मुक्टी गावापासून 400 ते 500 फुट चारी तयार करून पाटली नदीत पाणी जर सोडले तर चिमठावळ, दराणे, रोहाणे, दलवाडे इत्यादी गावांचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो आणि प्रत्येक उन्हाळ्यात दोन तीन वेळा हे पाणी सोडले गेले पाहिजे यामुळे या परिसरातील जमिनीत पाण्याचे पर क्यू लेशन होऊन विहिरींना बऱ्यापैकी पाणी येऊ शकते यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व गुरांच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो म्हणून वाडी शेवाडी धरणाचे पाणी पाटली नदीत चारी तयार करून सोडावे अशी मागणी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांनी शासनाकडे केलेली आहे







