त-हाडी येथे २१व २२ एप्रिल पासून यात्राउत्सव
त-हाडी – शिरपूर तालुक्यातील त-हाडी परिसराचे ग्राम आराध्य दैवत आई सतीवानू माता मंदिराची यात्रोस्तव दि २१ व २२ एप्रिल पासून सुरुवात होणार आहे
मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या उद्रेकामुळे यात्रा उत्सवा बंद ठेवण्यात आला होता ह्या वर्षी मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी झाला आहे त्यामुळे यात्रा उत्साह भरविण्यात येत आहे.
ब-हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावर शिरपूर तालुक्या पासून गावापासून २० किलोमीटर अंतरावर असलेले त-हाडी गाव आहे.या ठिकाणी दोन दिवस मोठया दिमाखात यात्रा भरणार आहे. दि २१ रतनभाऊ नगरदेवळेकर यांचा तमाशा आयोजित केले होते व २२रोजी राजेश गणेश सांगवी कर तमाशा होणार आहे यात्रेसाठी नाशिक ,जळगाव ,धुळे ,नंदुरबार नाशिक, ,,मालेगाव गुजरात, मध्ये प्रदेश तसेच पर राज्याहून भाविक येत असतात. यात्रा निमित्ताने आई सती वानु माता मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.तसेच यात्रेसाठी हॉटेल, पाळने, संसारूपयोगी वस्तू विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत.
मंदिरात प्रवेश केल्यावर. मन प्रसन्न होते ही यात्रा चैत्र शुद्ध पंचमी दिवशी भरत असते.यात्रेनिमित्त गावातून दोन दिवस तगतरावाची मिरवणुक काढण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी सती वानु माता यात्रा उत्सव समिती त-हाडी , दुसऱ्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे , सचिन भामरे,वामन भामरे,विशाल करंके, सतोष भामरे पुजारी पंकज पाटील, राकेश भामरे,यांच्या कडुन तमाशाचे ही आयोजन करण्यात आले आहे.अनेक भाविकांचे नवस देखील असतात.तसेच या यात्रेसाठी सती वानु माता यात्रा उत्सव समिती,त-हाडी व ग्रामस्थ व तरुण वर्ग सहकार्य करीत आहेत.







