त-हाडी येथे ‘शाळापूर्व तयारी मेळावा’ उत्साहात संपन्न
त-हाडी
शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील जि.प.शाळेत पहिलीच्या वर्गासाठी दाखलपत्र बालकांची शाळापूर्व तयारी करुन घेण्यासाठी ‘ शाळापूर्व तयारी अभियान’ राज्यभर व तालुक्यात राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हास्तरीय शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयेजन त-हाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन त-हाडी गावातील पोलिस पाटील प्रतापसिंह गिरासे,, प्रथम लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर
यांच्या उपस्थितीत पार पडले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पूजन व प्रतापसिंह गिरासे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
सन 2022-23 मध्ये इयत्ता पहिलीसाठी दाखलपत्र बालकांनी व त्यांच्या पालकांनी या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदविला. हे अभियान साधारणपणे 8 ते 10 आठवडे घेण्यात येणार आहे. यावेळी विद्यार्थी यांनी प्रवेश घेणाऱ्या बालकांना आणि सोबत आलेल्या पालकांना मार्गदर्शन केले.
पहिले पाऊल
कुंकवाचा पाण्यात पाय बुडवून शाळेत प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांचे शाळेतील पहिले पाऊल कोऱ्या कागदावर उमटवण्यात आले.
त्यानंतर शाळा पूर्व तयारी म्हणजे लावलेल्या स्टॉल वर विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांची चाचपणी करण्यात आली.आणि मेळाव्यास गावातील प्रवेश पात्र बालकांसह पालकांनी उस्फुर्त सहभाग मोठ्या संख्येने नोंदवला होता.
स्टॉल क्र.1) नाव नोंदणी
या स्टॉलवर प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
स्टॉल क्र. 02) वजन उंची
विद्यार्थ्यांचे वजन व उंची मोजण्यात आली व त्याची नोंद घेण्यात आली.
स्टॉल क्र. 03) शारीरिक विकास
या स्टॉलवर विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमता तपासण्यात आल्या. पुस्तक डोक्यावर घेऊन चालणे पेन्सिल छिलने, दोरीवरच्या उड्या मारणे चित्र रंगवणे इत्यादी कृती यात घेण्यात आल्या.
स्टॉल क्र. 04) बौद्धिक क्षमता
या स्टॉल वर विद्यार्थ्यांना रंग आकार प्राणी पक्षी फुले फळे भाज्या इत्यादींचे वर्गीकरण करणे या क्षमता अवगत आहेत की नाही याबद्दल तपासणी करण्यात आली.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जय मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष सुनील धनगर , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर धनगर, शाळा व्यवस्थापन समिती उपअध्यक्ष जितेंद्र खोंडे रावसाहेब चव्हाण, तुळशीराम भामरे, मुख्यध्यापक गणेश पवार, पालक,विद्यार्थी, परिसरातील शिक्षकवर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







