भटाणे येथे दश वार्षिक सुक्ष्म आराखडा कार्यक्रम
त-हाडी ता.20
महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत दश वार्षिक सुक्ष्म आराखडा तयार करणे करीता तालुक्यातील भटाणे गावाची निवड करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.सदस्य भिमराव ईशी यांनी केले या प्रसंगी कृषी विस्तार अधिकारी संजय जगदेव एपीओ मदन देवरे,एपीओ महेंद्र धनगर सरपंच विकास पाटील, उपसरपंच मिलींद ईशी पो.पा.धनंजय पाटील, सदस्या सुवर्णा पाटील,मंगला मोरे,संजय भील,जन्याबाई भील व मान्यवर उपस्थीत होते.एपीओ देवरे यांनी उपक्रमाची माहीती देतांना येथील गावाची समृध्दी योजनेतुन सर्व सामान्य लोकांचा सहभाग घेऊन जास्ती जास्त लाभ देऊन सामान्य व्यक्ति समृध्दकसा होईल हा योजनेचा उद्देश असुन या चार दीवसात रोजगार हमी योजनेचे कर्मचारी गाव फेरी व शिवार फेरी करून दहा वर्षाचा कृती आराखडा तयार करुन विकास कामाचे नियोजन करण्यात येईल. रोजगार हमीच्या सिंचन विहीर,नापेड कंपोस्ट,शोष खड्डे,रोपवाटीका,घरकुल,फळबाग,वृक्ष लगवड,शेत तळे यांचा लाभ गरजु लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
कार्यक्रमा नंतर तहसिलदार आबा महाजन व गटविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी गावफेरीची सुरुवात केली तव्हा म्हणाले की,सदर आराखड्याच्या माध्यमातुन रोजगार हमीच्या शेती बरोबर दुय्यम व्यवसाय म्हणुन गोठा,कुकुट पालन शेड तसेच सेंद्रीय शेतीत नाडेप,गांडूळ खत,तर भुजल पातळी साठी शोष खड्डे,बंधारे योजनेत असुन जजास्तीजास्त गरजु लाभार्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
शासन आपल्या दारी म्हणत रोजगार हमी योजनेचे पंचायत समीती कर्मचारी,सतिष पावरा,मुकेश पवार,प्रफुल पाटील, श्याम पावरा,संकेत पाटील सागर पावरा संदीप पाटील…
तहसिल कर्मचारी शशिकांत बेलदार हे कर्मचारी गाव व शिवार फेरीतुन सर्वे करत आहेत







