देवणी उपोषण !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
लातुर-देवणी : देवणी उपोषण तात्पुरते अखेर माघार घेण्यात आला असुन, पंधरा दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा संपर्क प्रमुख आनंद जीवणे यांनी दिनांक 21 जुन पासुन येथील देवणी नगर पंचायत समोर अमरण उपोषणास देवणी तालुक्यातील तोगरी ते तुरोरी या संबंधित कामाच्या भ्रष्ट अभियंत्यावर निलंबीत करणे , मुख्यालयी राहत नसलेले व पगारी उचलत असलेले तालुका कृषी कार्यालयचे तालुका कृषी अधिकारी , सहाय्यक कृषी अधिकारी , पंचायत समितीचे अधिकारी , ग्रामसेवक , ग्रामविकाधिकारी , देवणी वन विभाग चे अधिकारी यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करून त्यांचा एक वर्षाचा पगार कोविड रुग्ण आरोग्य विभागास जमा करावे आदी मागण्यासाठी उपोषणास बसले होते. या उपोषणाला पाठींबा म्हणुन ऑल इंडिया पॅन्थर सेना , आडत व्यापरी संघटना , व्यापरी संघटना , वकील संघ देवणी , भीम आर्मी आर पी आय भारत एकता मिशन यांनी पाठींबा दर्शविला होता. काँग्रेसचे नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयदादा साळुंखे यांनी मध्यस्थी दुवा सादून सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधुन मागण्या काही मान्य झाल्या तर काही मागण्या अध्याप प्रलंबीत राहिल्याने त्यांना पंधरा दिवसाचा अल्टीमेटम वेळ देऊन मागण्या मान्य नाही झाल्यास पुन्हा उपोषणांस बसणार असल्याचे लेखी निवेदन देऊन तात्पूरते उपोषण माघे घेण्यात आले
यावेळी काँग्रेसचे नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयदादा साळुंखे , जेष्ठ नेते मल्लिकार्जुन मानकरी, व्यापरी संघटनेचे अध्यक्ष मानिकारव लांडगे मल्लिकार्जुन डोंगरे सोमनाथ कुडते , शिरीष निला , मालबा घोणसे , वकील अजित बेळकोने , नामदेव मुराळे ,चेतन मिटकरी , अशोक लुल्ले, माजी सरपंच बाबुराव लांडगे , अमोल जीवणे , योगेश सजन शेट्टे श्रीमंतांना लुल्ले संजय कुमार जीवने गणेश मुच लम श्याम भंगे संतोष अंबुलगे चंदू मस्कले आदिजन यावेळी उपस्थित होते.







