पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका,शेतकरी व शेतीउपयोगी लागणारे वाहनधारक त्रस्त
त-हाडी प्रतिनिधीः
दिवसेंदिवस वाढत असल्याने याचा फटका शेती व्यवसायाला ही जाणवत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
सध्या रब्बीतील गहू, हरभरा, व इतर पिके काढणी अंतिम टप्यात सुरू आहे. तर काही शेतकऱ्यांचे शेत खाली झाल्याने नांगरटीची लगबग सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र पीक काढणी साठी लागणाऱ्या पुरेशा मजूर वर्गाअभावी पीक परिपक्व झाले आहे. यामुळे गहू, हरभरा कडक उन्हात पूर्णपणे सुखली गळत आहेत. याची लवकर काढणी व्हावी म्हणून शेतकरी यंत्र सामुग्रीचा मोठ्या प्रमाणात वापर करून शेतीची कामे उरकून घेत आहेत.
मात्र सध्या डिझेलचे भाव गगनाला भिडत असल्याने ट्रॅक्टर व्यवसायिक व हार्वेस्टर व्यवसायिकांना परवडत नसल्याने नांगरटी, रोटा मारणे, शेऱ्या पाडणे, पास मारणे, पेहरणी यंत्र,गहू, हरभरा काढणी, हार्वेस्टर मशीन द्वारे गहू काढणी व ट्रॅक्टर मशागतीचे दर प्रति एकरी दोन शे ते तीनशे रुपये वाढवून हि ट्रॅक्टर व्यवसाय परवडत नसल्याचे ट्रॅक्टर व्यवसायीकांनी सांगितले.
मात्र याचा फटका ट्रॅक्टर व्यवसायिक व शेतकरी या दोघांना सहन करावा लागत आहे. सध्या राज्यात कुठेना, कुठे अवकाळी पावसाने काढणीवर आलेल्या विविध पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे दस्तावलेला शेतकरी पीक काढून घरात आणण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करीत आहे.तर डिझेलच्या भाववाढीमुळे बहुतेक ट्रॅक्टर मालकांनी ट्रॅक्टरचा व्यवसाय बंद केल्याने वेळेवर पीक काढणीसाठी व नांगरटीसाठी ट्रॅक्टरची प्रतीक्षा करावी लागत आहे.
● प्रतिएकर शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरचे वाढलेले दर ●
नांगरटी – १५०० रुपये एकरी,रोटावेटर – १२०० रुपये एकरी
काड्या, पासमारने – ९०० रुपये एकरी
पेहरणी यंत्र मशीन – १००० रुपये एकरी सरी पाडणे – ८०० रुपये एकरी
गहू, हरभरा, काढणी – १३०० रुपये प्रति तास
हार्वेस्टर द्वारे गहू काढणी – १८०० रुपये एकरी
प्रतिक्रिया
सध्या डिझेल भाववाढीमुळे ट्रॅक्टरचा व्यवसाय नपरवडनारा झाला आहे.तर दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणा मुळे हवं तेवढे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी वर्गही हवालदिल झाला आहे. मात्र शेती शिवाय दुसरा पर्याय नसल्याने नाविलाजाने शेती करून उदरनिर्वाह भागावला जात आहे.
शरद सोनवणे ट्रॅक्टर व्यवसायिक व शेतकरी त-हाडी






