अन् स्वप्र सत्यात उतरलं
दोन हद्दीत वतनदारी करणाऱ्या रावसाहेब बापूला गावच्या राजकारणाचा ओढा लागला होता. सासवडात वाघिरे सायन्स कॉलेज करून आलेल्या पोरांच्या टोळक्यानी भलतीच गावरान दल राजकारणाची नशा बापूच्या डोक्यात घातली होती.
काळ असेल साधारण.१९९२-९३ ……वर्षापूर्वीचा. घरचं बिंड देवापुरातून सासवड (पून्या) ला इस्टी मूळ पोच होत असल्यामुळे शेती वाडी, भाव भावकीचा कटाळा आलेल्या बापजाद्यानी कार्टी शिकून मोठी अधिकारी होतील, लष्करात भाकऱ्या तरी किमान थापतील. या आशेने कोसो मैल ज्ञान _ इदण्यान गिरवायला पाठवली होती.
त्यातच देवापूर मधील कर्मवीर भाऊराव पाटील सायन्स कॉलेज मधून बारावी पास झालेल्या पोरांना सासवड सायन्स कॉलेज ला एडमिशन मिळाले, आता सायन्स चा इद्यार्थी म्हणल्यावर लेकरांच्या गोल डोक्याला निस्ता तापच असणार की, मग अभ्यास करायचा तर तभेत बिभेत बी चांगली असायला हवी म्हणुन पोरांच्या घरातील कर्त्याधरत्यानी तूप ,लोणी, मटण ,मच्छी अन् दुधाच्या किटल्यासह सह भाक्रीच बींड द्यायला सुरवात केली. गावठी ढंगाची सवय लागलेली अन् बापजाद्याला पोटा पाण्यापुरती बागायती जमीन असल्यामुळे तसा इदण्यानाचे धडे गिरवायला गेलेल्या पोरांना बी घरचं जेमतेम असल्यानं लय चिंता न्हवतीच. गावातील महाद नानाचा दया, दुकानदाराचा जालू , सरांचा किरण, पांडुरंग अप्पाचा राव्या, धोंडी काकाचा हम्या, हि जेमतेम पाच सहा पोरं बाहेर गावी शिकायला असणं हि गावासाठी त्या काळी कुतूहलाच विषय होती. सोबतीला नायकाचा दत्तू पुण्यातील कँपात राज्य राखीव पोलीस दलात नोकरीला असल्यामुळे पोरानाही करमणुकीचे साधन होते.
त्यावेळी आम्ही असू चौथी पाचवीत, गडी सुट्टीला आल की गाव कट्ट्यावर मातुर हेंचीच चर्चा चालायची . आता सास्वडात जाऊन काय दिवे लावतात , काय माहित. म्हणतात ना चांगल्या गोष्टी करताना इरोध मातुर लय जोमाचा असतो. निंदा नालस्ती ला छेद देऊन ग्रॅज्युएशन कंप्लीट करून सगळ गडी त्या काळात एक्स्टेंशन घेऊन इंडिया टीम जोशात मायदेशी परतते तसे गावी परतले, त्याकाळच शिक्षणं अन् आताच शिक्षणं यात जमीन अस्मानाचा फरक हाय. पोरांनीमात्रकरुन दाखवल.या गोष्टीला आता तब्बल ३० वर्षाचा काळ लोटला.
गावात आल्यावर कोणी शेतीकडे वळले तर कोणी छोक्रीच्या ओढीने नोकरिकड ओळले. मातुर आई बापाच्या अन् थोरल्या भावाच्या कष्टाच चीज होईल असे इमान ठेऊनच पुढची वाटचाल पोरांनी चालू ठेवली, बाप जाद्याच्या कष्टाला अन् स्वाभिमानाला अन् आईन पहाटे उठून केलेल्या भाकर अन् त्या गाठुड्याला कसला बी तडा जाता कामा नये हे वृत्त स्विकारून गावात शिक्षणं घेऊन आलेल्या पट्ट्यांची वाटचाल सुरु राहिली.
याचं सुशिक्षित टीम चा कर्णधार रावसाहेब उर्फ बाप्या त्या काळात पुण्यातलं विविध मैदानी इव्हेंट चावडी पुढं घ्यायचा. बॅट बॉल च नियोजन मात्र कधीच गावं न सोडलेल्या फास्टर बॉलर के .के कडे असायचं. मैदानात हाउज दॅट म्हणूनच उसन अवसान आणणारा के. के पोरांच्यात हत्तीच बळ आणायचा.सुट्टी निमित्त पुण्याच्या गल्लो गल्ली फिरल्याली ह्या पोरांची एक भलतीच टीम नेटवर्क गावात झालं होत. शेती वाडीसहीत आयुष्य भराच्या लग्न लाईसनित अडकून आपल्याच मातीत काबाड कष्ट करून दगड धोंड्याच्या शेतीला आधुनिकीकरणाचा वास अंन सहवास देऊन बाप जाध्याने घाम गाळलेल्या मातीशी इमान राखत ही पिढी स्थिर स्थावर झाली होती.
गावी असताना च मी बाप्या ला अलगद हेरले होते, ह्यो गाव तिढ्यात घुसणार, अन् खरोखरच घुसला तर भोळा भाबड्या बाप्याचा जुन्या जाणत्या पुढारर्यांपुढे कसा टिकाव लागणारं? याची शंका मला होतीच, अन् झालेही तसेच
त्या काळी मी पोटासाठी पुण्यात धडपडत होतो.. सहा महिन्याच्या पिरेड वर काम करायचो, तिथं हि मी नोकरीनिमित्त पुण्यात असताना याचं टीम मधल्या आबा अन् सुनील तात्यान मला तीन चार वर्ष चांगलीच साथ दिली होती, त्यामध्ये तात्या मात्र अशाश्वत शेतीचा धसका घेऊन पुण्यात एका कंपनीत वेल सेटल झाला होता. इकडे बाप्या मातुर शेती सहित गावरान राजकारणाचे धडे गिरवन्यात धुंद होता. रोज दहा वीस शेतीत राबणारी कार्टी सूर्यास्ताला गोळा करून, क्रिकेट, इटू दांडू, कब्बडी हे मैदानी खेळ चावडी समोर दिव्यावर घ्यायचा, युवकांचे संघटन करण्याची अन् हाताबाहेरची ताकद अजमावण्याचा भलताच कण्ड असलेल्या राव बापूचा एके दिवशी मी स्वारगेट एस .टी स्टँडवर असताना फोन आला, काळ होता…….२००५ चा
फोन उचलताच बाप्या म्हणाला”विशल्या, मी ग्राम पंचायतला उभा हाय.सगळीच पुढारी एक झालेत अन् आपुन त्यांच्या इरोधात पॅनल टाकलाय. लय भारी वातावरण हाय….. मताला य बरका.. वाटल्यास या जायचे पै क देतू. खिशात दमडी नसताना पैक्याचा इंतजाम करणारा बाप्या मातुर “तुला यायला लागतंय, बाप्या बी दम धिरान बोलत होता. कदाचित माझ्याकडे मतदानासाठी तीन मते होती म्हणून.मलाही जाणीव झाली, मतदानाचा अधिकार आलाय, मतदान करायला जायचेच, त्यात बाप्या फोनवरून म्हनला होता या जायचं पैक बी दितू म्हणुन, आदल्याच दिवशी देवापुरात दाखल झालो. अखेर मतदानाचा तो दिस उजाडला, ग्राम पंचायत निवडणुकीला उभा असलेल्या राव बापूच्या पार्टी ला पुढील पार्टी चे तगडे आव्हान होतेच. आदल्याच रात्री त्याला एक नवा कोरा करकरीत खादी शर्ट लाडाने घालायला दिला. पुण्याच्या टेलरची शिलाई असणारा खादी शर्ट हि बाप्याला भलताच आवडला.(शर्ट देण्यामागे त्याचा जोश वाढवणे हा हेतू होता)
मतदान दिवशी जशी कोंबड्या न बाग दिली तशी भल्या पहाटे बाप्याने म्हातारीनं तापवायला ठेवलेलं पाणी अंगावर घेऊन मी दिलेला खादी शर्ट घालून टोपिला पन्नास रुपये पदर मोड करून गडी मतदान केंद्रात पोचला, निकालाची घंटा जवळ येत होती. तसा बाप्या अस्सल पुढाऱ्या सारखा होश हरवून मतदारात जोश आणत होता . ग्राम पंचायत निवडणूक मतदानाची अखेरची घंटा समीप येऊन पोचली होती. गुलाल ताशात जल्लोष करण्याच्या उद्देशाने दोन्ही पार्ट्या एकमेकांसमोर मतदान केंद्रावर सज्ज होत्या . शेवटीं निकाल बाहेर आला अन्….
विरोधी पार्टीच्या पोरांनी मतदान केंद्रावर चं हाळी दिली, बाप्याची पार्टी पडली होती.अन् हिरमुसलेल्या बाप्याने शाळेच्या कंपाउंड मधल्या तारेतून कसरत करत मधल्या वाड्याची वाट धरली.”असू द्या पहिली बार हाय, पुण्या बघू”म्हणत घराची वाट धरली. जुन्या जाणत्या पुढारी मंडळी पुढे मातुर बाप्याच्या पार्टी ने लोटांगण घातले होते. मात्र काटे की लढत दिली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी भेटल्यावर बाप्या म्हणाला”विषल्या, न्हव मग हून हून काय हुईल, पडलू म्हणून काय झालं, हेवक आपुन गरीब माणूस हाय, लेकाच्या नाद केला पण वाया गेला की…..
बाप्या तर पडलाच पण पार्टी हि पडली,या दुःखाचं विश्लेषण करत दोन दिवसांनी गँग कट्ट्यावर बसली होती. अमुक ने गंडवले तमुक ने गंडवले, त्या बैठकीत माझा हि एका नारद मुण्याने विषय काढला, अन् जोरात बोंबलला…” लगा विष्ल्यान बाप्या ला खादी शर्ट दिला पण मत काय दिलं नाय”असे म्हणताच माझ्या नावाचा त्या बैठकीतील गड्यानी मात्र रसगुल्ला करून टाकला.
दुसऱ्यादिवशी नारदाने टाकलेल्या खड्याने मात्र निशब्द झालो. गावात आल्यावर रुसवा फुगीने मात्र मी गोंधळात पडलो. मतदान तर केलंय, मात्र बदनामी ही होतेय. त्याला माझा इलाज न्हवता, पण बाप्या पडलेल्याच दुखः मात्र ..१७.. वर्षे मनात घर करून होत.
एप्रिल२०२२ मध्ये देवापूर पळसवाडे विकास सोसायटी च्या निमित्ताने बाप्या ला उभा करून पुन्हा निवडून आणण्याची व नारदमुनिमुळे विनाकारण लागलेला डाग पुसायची नामी संधी माझ्यावर येऊन ठेपली, मागील महिन्यात झालेल्या निवडणूकीत पुनश्च बाप्या उभे राहीला. त्यांच्या संपूर्ण पॅनल ला मतदान करून मी मात्र बदनामीची मतपेटीतून परत फेड केली होती. मागील निवडणूकीत निवडून येण्या अगोदर खादी शर्ट दिला होता. यंदा मात्र निवडून आल्यावर च म्हसवड ला जाऊन गड्यासाठी पोशाख घ्यायचा ठरवल होत, दिवस उजाडला, बाप्या उर्फ रावसाहेब पांडुरंग बाबर आता बाप्याचे राव बापू झाले होते, सदस्यच न्हवे तर दोन्ही गावच्या सोसायटी चा चेअरमन झाला होता.
चवली पावली कमावणाऱ्या ला हजारात खरचायची माहिती नसणाऱ्यातला मी मात्र “चे अर मन साहेब तुम्हाला ड्रेस घ्यायचाय ह… म्हणत रोजच आश्वासन देतो. परवा ग्राम पंचायत मध्ये घर पट्टी भरायला शहाजी पंचाच्या दालनात गेलो होतो, तिथं हे महाशय एक लिफाफा घेऊन आले होते, मला पाहताच म्हणाले
पत्रकार, घर पट्टी भरायला पैसे देऊ का म्हणत राव बापू ने घातलेली साद मी दिलेल्या मताच्या कित्येक पटीने माझ्यासाठी मोठी होती. मागील निवडणूकीत बाप्यासह पार्टी हि पडली होती, यंदा बाप्यासह पार्टी हि सत्तेत आली .बाप्या चेअरमन झाला. अन् नियतीने शब्दात अडकलेल्या दोघांचाही पांग फेडले. राव बापू रोज सकाळी गावात येतो, तेव्हा त्याच्याकडे बघितल्यावर पुन्हा खादी शर्टाच्या आठवणी ला उजाळा मिळतो, पुढारी झालेला बाप्या आता मतदारांना दिलेल्या आश्वासनाला आश्वासन पूर्तीत रूपांतर करण्यासाठी मातुर सज्ज झाला आहे.
विशाल माने, ग्रामीण पत्रकार(माण)
देवापू







