आदर्श विदयालयात विविध खेळांचे तालुका स्तर शासकीय उन्हाळी शिबीराची सांगता
त-हाडी
दि-१२ – दि. १ मे २०२२ पासुन आदर्श माध्यमिक विदयालय,कळमसरे येथे विविध खेळांचे तालुकास्तर उन्हाळी शिबीरजिल्हा क्रीडाअधिकारी,
आसारामजी जाधव व तालुका क्रीडा अधिकारी गुरूदत्त चव्हाण यांचे मार्गदर्शनाने धुळे जिल्हा क्रीड़ा अधिकारी कार्यालय,व तालुका शारीरिक शिक्षक संघटना,शिरपूर, तालुका क्रीडा संयोजन समीती व धुळे जिल्हा तलवारबाजी संघटना, यांचे संयुक्त विदयमाने, आदर्श माध्यमिक विदयालय कळमसरे,ता. शिरपूर येथे विविध खेळांचे तालुका स्तर शासकीय उन्हाळी शिबीर सुरू होते. त्याचा समारोप आज दि.१२ मे २०२२ रोजी कळमसरे ता. शिरपूरचे माजी सरपंच,
. विश्वनाथ झुलाल माळी यांचे हस्ते खेळाडूंना अल्पोपहार बिस्कीट पुडे वाटप करून करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून किशोर माळी,माजी सरपंच,कळमसरे,. रमेश माळी, माजी ग्रा. पं. सदस्य, मिलींद सोनगडे,योगाचार्य, रावसाहेब चव्हाण,संयोजक तालुका क्रीडा संयोजन समिती, अशोक महाजन ,अध्यक्ष शा. शि. संघटना हे उपस्थित होते.
शिबीरा साठी तालुका क्रीडा अधिकारी,धंदर साहेब, ए. आर. बोथीकर ,गुरूदत्त चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच तालुक्यातील खेळप्रिय विदयालयांनी ही सहभाग नोंदविला.
या दहा दिवसीय शिबीरात,खेळाडूंना तलवार बाजी,बॅण्डवादन,बासरी वादन,योगासने,प्राणायम, सायकलींग, खेळ प्रशिक्षण केंद्रास भेंट,मैदानी खेळांत,लांबउडी,उंचउडी,पुलअप्स, तायक्वांदो,श्रमदान,फुटबॉल,खो-खो,व्हॉलीबॉल,टेनिस क्रीकेट, कबड्डी, व आरोग्य मार्गदर्शन वर्ग,यात आहार,व्यायाम,खेळ,खेळापुर्वी उत्तेजित व्यायाम,शीत व्यायाम
या बाबत डॉ.आदीत्य परदेशी,यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले .
दहा दिवसात अशा विविध खेळ उपक्रमात सहभागी होऊन विदयार्थीनीं आनंद व समाधान व्यक्त केले.
आज समारोप दिनी जय-जय रामकृष्ण हरी ची धुन . गणेश सुकलाल माळी,इ . ८ वी, लक्ष्मीबाई विठ्ठलराव दुराखे माध्यमिक विदयालय,आळंदी देवाची याने आज शिबीरात पखवाज वाजनाचे प्रशिक्षण देतांना वाजवुन दाखविली.
या नंतर विविध मनोरंजक खेळ ,जसे आंधळी कोशंबीर,रस्सीखेच,पंजा लढविणे व बॅण्डवादनात विविध प्रकारच्या चाली वाजवुन विदयार्थ्यानी आनंद घेतला.
शिबीरा साठी,विदयालयाचे मुख्याध्यापक,
युवराज पाटील
जेष्ठशिक्षक, शिवाजी जाधव,राजेंद्र सोनवणे,यांनी विशेष सहकार्य केले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी क्रीडाशिक्षक श्री. ए डी. महाजन व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी व तालुक्यातील विविध खेळ मार्गदर्शक,प्रशिक्षक यांनी परीश्रम घेतले.आज दि. १२ मे रोजी विदयार्थ्यांनी बँड वाजवुन खेळाडूंनां निरोप दिला







