वाघाडी आश्रमशाळेजवळ टाटा मॅजिक वाहनाला डंपरची मागून जोरदार धडक; एक जण ठार तर 12 जण जखमी
त-हाडी
शिरपूर शहादा महामार्गावरील वाघाडी आश्रमशाळेजवळ खामखेड्याहून शिरपूर कडे येणाऱ्या टाटा मॅजिक वाहनाला त्याच दिशेने (गुजरात राज्यातून)येणाऱ्या कोळशाने भरलेल्या डंपरने मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात टाटा मॅजिक वाहनातील 18 वर्षीय युवक ठार झाल्याची घटना घडली असून दोन जण गंभीर तर अन्य 10 जण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज सकाळी 7 वाजेच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी शिरपुर शहर पोलिस ठाण्यात मोटार अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
या अपघातात एक मयत तर बारा प्रवाशी जखमी झाले असून पैकी दोघांना गंभीर दुखापत झाल्याने धुळे येथे हलविण्यात आले आहे.
खामखेडा येथील टाटा कंपनीची क्रमांकाची टाटा मॅजिक प्रवासी घेऊन शिरपूर कडे येत असताना वाघाडी गावाजवळील आश्रमशाळेजवळ सकाळी 7 एम.एच.18 डब्ल्यू 5003 सुमारास गुजरात राज्यातूनन भरधाव वेगाने येणाऱ्या जी.जे.21 वाय 9300 या क्रमांकाच्या कोळशाने भरलेल्या वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात खामखेडा येथील उन्मेष राजेंद्र पाटील वय 18 हा जागीच मयत झाला तर प्रमोद बारकू शिरसाट 42 कविता भगवान वाडीले 18, गोपाल संतोष पवार 18, कृष्णा रमेश शिंदे 14, आकाश बबलू कुराडे 15 अरुण संतोष वडर 12 किरण संतोष वडर 15 संतोष बारकू वडर 25 भिका महादू धनगर 60 हे जखमी झाले आहेत.
जखमींना तत्काळ 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने शिरपुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यात डॉक्टरांनी उन्मेश यांनी यास तपासून मृत घोषित केले. तर जखमींपैकी टाटा मॅजिक चालक प्रमोद शिरसाठ व अन्य एक प्रवासी या दोघांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना धुळे येथे हलविण्यात आले असे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले. याबाबत घटनास्थळी पोहेकॉ. जी.डी.पावरा, पो.ना.गणेश सोनवणे यांनी अन्य कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
याप्रकरणी शिरपुर शहर पोलीस ठाण्यात मोटारवाहन अपघाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास शिरपुर शहर पोलिस करीत आहेत.







