शिरपूर खताचा होणारा काळाबाजार थांबविण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा; रावसाहेब चव्हाण
त-हाडी (प्रतिनिधी) –
शिरपूर तालुक्यात व त-हाडी परिसरातील अठरा गावाचा समावेश येत असून गत काही वर्षापासून रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांना कृषी केंद्रासमोर चकरा माराव्या लागत आहेत. विक्रेत्यांकडून खताची तीव्रटंचाई भासवून शेतकऱ्यांची मनमानी लूट चालविली जाते. ऐन पेरणीच्या मौसमावर खत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. खरीप हंगाम अगदी १० ते १२ दिवसावर येऊन ठेपला आहे.
आता शेतकरी खते बियाण्याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी करतात. खते बियाणे खरेदीसाठी ज्या शेतकऱ्याकडे पैसा नाही, बँकेच कर्ज सध्या मिळाले नाही अश्या शेतकऱ्यांची यावर्षीही परवड होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा घेत काही कृषी सेवा केंद्राच्या संचालकांनी खताचा मोठ्या प्रमाणात साठा असतानाही रशीया आणि युक्रेन युद्धाचा कारण देत खतांची कृत्रिम टंचाई भासवत शेतकऱ्यांना वेठीस धरून शेतकऱ्यांची लूट होण्याची शक्यता दिसून येत आहे.
बहुतांश कृषी संचालकांनी खताचा साठा करणे सुरू केले आहे. खतांचा होणारा काळाबाजार थांबविण्यासाठी व शेतकऱ्यांना योग्य दरात खते उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, दरवर्षी होणारी परवड यावर्षीही शेतकऱ्यांवर येऊ नये यासाठी कृषी निहाय नियोजन करावे अशी शिरपूर
कृषी विभागाच्यावतीने तालुका निहाय नियोजन करावे, अशी मागणी रावसाहेब चव्हाण त-हाडी ता. शिरपूर यांनी केली आहे.







