• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

नफरवाडी ग्रामस्थ तर्फ हवालदार बापू भगवानराव कवठेकर यांचा नफरवाडी ग्रामस्थांतर्फे नागरी सत्कार

माणगंगा by माणगंगा
June 7, 2022
in महाराष्ट्र
0
नफरवाडी ग्रामस्थ तर्फ हवालदार बापू भगवानराव कवठेकर यांचा नफरवाडी ग्रामस्थांतर्फे नागरी सत्कार

नफरवाडी ग्रामस्थ तर्फ हवालदार बापू भगवानराव कवठेकर यांचा नफरवाडी ग्रामस्थांतर्फे नागरी सत्कार

पाटोदा ;

पाटोदा-जवळच असलेल्या नफरवाडी येथील भूमिपूत्र हवालदार बापूराव भगवानराव कवठेकर 22 वर्ष सैन्यात देश सेवा करून आपल्या मातृभूमी नफरवाडी येथे सहीसलामत व सुखरूप गावी आले म्हणून गावातील आप्पासाहेब मंडलीक (फौजी )सरपंच बंडू सवासे उपसरपंच आबाराजे चव्हाण माजी सरपंच भिमराव तांबे माजी सरपंच बापूराव सवासे दत्तात्रय ढेरे सर मुख्याध्यापक संजय सावंत सर लहू ढेरे (फौजी) तसेच पाटोदा येथील नगरसेवक वाघमारे भारतीय जनता पार्टीचे
बीड जिल्हा उपाध्यक्ष मा. ॲड. सुधीर घुमरे , सुरेंद्र बाबा तिपटे समाजसेवक तसेच पंचक्रोशीतील पारगाव घुमरा ,येवलवाडी आणि पाटोदा येथील नागरिक यास सेवापूर्ती सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले .

गावातील प्रतिष्ठित नागरिक तरुण युवक माता-भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या
सर्वप्रथम बापूराव कवठेकर आपल्या गावी आल्याबरोबर तोफांची सलामी देऊन ढोल-ताशाच्या गजरात त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी गावातील महिलांनी आरतीचे ताट घेऊन या सैनिकाला औक्षण केले नंतर ग्रामपंचायत कार्यालय समोर भाषणाचा कार्यक्रम आयोजित केला होता

या ठिकाणी आल्याबरोबर बापू कवठेकर यांचे हस्ते स्वराज्य दिनाचा ध्वज फडकवण्यात आला . सर्वप्रथम हनुमान मंदिरात जाऊन पूजन करून या सैनिकाने आशीर्वाद घेतले नंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रथम नागरिक गावचे सरपंच बंडू सवासे ग्रामसेवक ओमप्रकाश सूर्यवंशी , फौजी आप्पासाहेब मंडलीक व बापूराव फौजी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमाला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली .याप्रसंगी बाहेर गावाहून आलेल्या कार्यकर्त्यांनी बापूराव कवठेकर या सैनिकाचा हार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गावाच्या वतीने सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते फेटा बांधून पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत करण्यात आले याप्रसंगी बाहेरून आलेल्या पाहुण्यांचाही गावाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली सर्वप्रथम मुख्याध्यापक श्री संजय सावंत सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बापूराव कवठेकर सारखा हुशार विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर होण्यासारखा असतानादेखील परिस्थितीमुळे त्याला शक्य झाले नाही म्हणून त्यांनी सैन्यात जाणे पसंत केले व 22 वर्षे देशाची सेवा केली आणि आपल्या मायभूमीला परत आले त्यांच्या जीवनातील सुरुवातीच्या हलाखीच्या परिस्थितीबद्दल सावंत सरांनी त्यांची हकीगत सांगितली.

कठीण प्रसंगांवर मात करून शिक्षण केले आणि सैन्यदलात भरती होऊन देशाची सेवा केली आता गावातील तरुण पिढीला सैन्य भरतीसाठी मार्गदर्शन करावे आणि गावाची सेवा करावी तसेच आपले कौटुंबिक जीवन सुखी समाधानी जगावे गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहकार्य करून नोकरीला लावण्यासाठी प्रयत्न चालू ठेवावेत हे सांगून भावी आयुष्य सुखी समाधानी व आरोग्यमय जीवन जगावं यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर माननीय दत्तात्रय ढेरे सर यांनी बापू कवठेकर बद्दलच्या आठवणी सांगितल्या त्याची जिद्द आणि चिकाटी प्रयत्न यामुळे तो यशस्वी झाला हे तरुण पिढीला आदर्श घेण्यासारखे आहे हे सांगितले तसेच ह भ प दराडे महाराज यांनीही सैनिकाची नोकरी कशी असते ?आणि सैनिक यामुळेच देश आणि देशातील जनता तशी सुखी राहते हे सांगून बापू कवठेकर यांना भावी आयुष्य सुखासमाधानाने जगण्यासाठी शुभेच्छा दिल्या. समाज सेवक सुरेंद्र बाबा तिपटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बापूराव फौजी यांनी आपल्या गावातील तरुण पिढीला सैन्या मध्ये दाखल करण्यासाठी योग्य प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करावे हे सांगितले.

ॲड. सुधीर घुमरे भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बापू कवठेकर यांनी आतापर्यंत देशाची सेवा केली आता गावाची व गावातील लोकांची समाजसेवा करून एक नवा आदर्श घालावा युवा पिढीला सैन्यामध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करावे हे सांगितले. पारगाव घुमरा येथील ह भ प आप्पासाहेब घुमरे यांनी बापू कवठेकर हा माझा वर्गमित्र आहे त्याच्याविषयीच्या आठवणी त्यांनी सांगितले व त्यांच्या भावी जीवनाला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी गावातील आजी-माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित महासांगवीचे श्री राधाकिसन गर्जे फौजी सरदार फौजी तसेच पाटोदा येथील माजी सैनिक मिळून तयार झालेली त्रिदल समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष सचिव व सर्व पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक तरुण युवा पिढी गावातील माता-भगिनी व पंचक्रोशीतील मान्यवर नेतेमंडळी अधिकारीवर्ग आणि बापू कवठेकर यांचे वर्गमित्र भरपूर प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शहाजी चव्हाण सर यांनी केले नाष्टा व चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Views: 146
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
शिवराज्याभिषेक दिनी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सायकल वरून 32 किलोमीटरचा प्रवास करत रस्त्यात भेटेल त्या व्यक्तीस शिवराज्याभिषेकाचे महत्त्व दिले पटवून

शिवराज्याभिषेक दिनी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सायकल वरून 32 किलोमीटरचा प्रवास करत रस्त्यात भेटेल त्या व्यक्तीस शिवराज्याभिषेकाचे महत्त्व दिले पटवून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)