मांजरे येथील उच्च शिक्षित नव दाम्पत्य वृक्ष लागवड करुनच चढले बोहल्यावर
जिवनात प्रत्येकाने एकतरी झाड लावावे विवाह प्रसंगी दिला त्यांनी संदेश
प्रतिनिधीः मांजरे
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे वाक्याची जान ठेवत ८जुन२२ रोजी नंदुरबार तालुक्यातील मांजरे येथिल नवरदेव चि. गणेश पाटील व वटबारे येथिल प्रियंका पाटील यांचा विवाह मांजरे या नंदुरबार येथे दुपारी ११ वाजता उत्साहात संपन्न झाला.
यावेळी आज घडीला मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्ष तोड व त्यामुळे झालेले पावसाचे कमी प्रमाण व ऑक्सिजनची कमतरता तसेच दिवसेंदिवस तापमान वाढ आणि पर्यावरणाचे बिघडत असलेले संतुलन, चोरट्या मार्गाच्या या वृक्ष तोडीमुळे पृथ्वीवरील सजीवांना अनेक समस्याचा सामना करावा लागत असुन वृक्ष लागवडीची नुसती जाहीरातबाजी तथा फोटोगीरी करुन भागायचे नाही तर लावलेल्या झाडांची निगा घेवुन त्यांना व्यवस्थित वाढविणे गरजेचे आहे
त्यांना वेळोवेळी पाणी,किटक नाशके देऊन त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे तर पृथ्वी वर वास्तव्यास असलेल्या प्रत्येक नागरीकाने जिवनात अथवा प्रत्येक वर्षी एक तरी झाड लावुन त्याला वाढवावे तरच आपले जिवन सार्थक झाल्यासारखे आहे,असे मत नुकतेच विवाह बंधनात लीन झालेले वर गणेश पाटील,Dip.mech व वधु प्रियंका पाटील B.sc या उच्च शिक्षित नव दाम्पत्यांनी आपल्या शुभविवाह सोहळ्या प्रसंगी वृक्ष लागवड करुन बोलल्यावर चढत सात फेरे मारले व झाडे लावा झाडे जगवा हा संदेश विवाहप्रसंगी उपस्थित वर्हाडी मंडळी व मान्यवरांना देत समाजापुढे एक नवा आदर्श उभा केला आहे .त्यांच्या या शुभ दिनी वृक्ष लागवडीच्या स्तुत्य उपक्रमाचे तालुक्यातील सर्व स्तरातुन कौतुक होत आहे
याप्रसंगी लग्न समारंभास असंख्य जनसमुदाय व नातेवाईक व मित्रमंडळी तसेच आप्तेष्ट प्राध्यापक शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.







