राजेवाडी कारखान्याची 77 लाखाची फसवणूक
दिघंची: श्री श्री सद्गुरु साखर कारखाना राजेवाडी ता आटपाडी या कारखान्याची सुमारे 76 लाख 78 हजार 422 रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद कारखान्याचे मॅनेजर सचिन दादा खटके यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सागर भारत खेडेकर राहणार बचेरी ता .माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी उसाने भरलेले वाहन कारखान्यात आले नसताना देखील सदर वाहनाचे वजन काट्यावर स्लिप ओपन करून दुसऱ्याच वाहनाचे भर वजन दाखवून उस वाहनाने वजनात फेरफार करून कारखान्याची एकूण 76 लाख 78 हजार 422 रुपयांची फसवणूक केली आहे म्हणून सचिन खटके यांनी सागर खेडेकर यांचे विरुद्ध तक्रार दिली असून याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाने करीत आहेत