पटेल प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव साजरा
विद्यार्थी व पालकांनी सेल्फी पॉइंटवर लुटला आनंद
त-हाडी
शिरपूर शहरातील आर सी पटेल मराठी प्राथमिक शाळेत शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांची वाजत-गाजत शाळेचा आवारात मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी शाळेत सेल्फी पॉइंट चा आनंद घेत पालकांसोबत फोटो काढले.
शिरपूर शहरातील आर सी पटेल मराठी प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त शाळेच्या पहिल्या दिवशी विविध कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांचे औक्षण करीत वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. यावेळी बालवाडीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. व त्यांची शहनाई च्या वादनात शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांसोबत पालकही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यानंतर विद्यार्थ्यांचा स्वागतपर कार्यक्रम घेण्यात आला.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बालवाडी ते चौथी च्या विद्यार्थ्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. बालवाडी वर्गातील प्रणाली अहिरे या विद्यार्थीनी चा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात सेल्फी पॉइंट करण्यात आला होता. या सेल्फी पॉइंट वर विद्यार्थ्यांसह पालकांनी सेल्फी काढण्याचा आनंद लुटला.
यावेळी माजी नगराध्यक्षा संगीता देवरे, बालाजी सेवा समिती चारू पाटील, दिव्या जैन, फरीदा बोहरी, निवृत्त मुख्याध्यापक टी.एन जाधव,मुख्याध्यापक सी डी पाटील आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन महेंद्र माळी यांनी केले.







