‘काले धन का काला सच ‘ : स्वाती मोराळे
देश व देशा बाहेरील काळा पैसा बाहेर काढून प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकण्याची घोषणा केली. यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले परंतु याला काहीही यश मिळाले नाही असे वाटते. अनेक धन दांडग्या लोकांचे भारताबाहेरील देशा मध्ये हजारो कोटी काळे धन आहे ते परत अणु असे सांगितले. स्विस बँकेत अनेक कोट्याधिशांचे रुपये आहेत व या बँकेच्या नियमानुसार कोणाचे खाते आहे व किती रक्कम आहे हे गुप्त ठेवले जाते. त्या बँकेशी सरकार संपर्क करणार व आशा भारतीयांची खाते सिल करणार आसे सांगण्यात आले. एवढेच नाही तर हे संपुर्ण काळे धन भारतात आणून प्रत्येक गरीब भारतीयांच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकणार ही फक्त अफवा ठरली.
भारता अंतर्गत ही खुप काळा पैसा आहे व मोठ्या नोटांचेसाठे मोठ्या प्रमाणात करून ठेवले आहे असा संशय घेऊन हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद करून टाकल्या. यातून ही एक ही काळ्या पैशांचा रुपया हाती लागला नाही. महीला भगिनींनी साचवून ठेवलेली पुंजी फक्त नवऱ्या लोकांच्या हाती लागली. पंतप्रधान ज्या रंगाचे जॉकेट घालतील त्या प्रत्येक रंगाच्या नोटा काढल्या. पाचशे हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या व दोन हजारांच्या नोटा काढल्या. या नोटा आता गायब झाल्या आहेत. गेले सहा महिन्यात एकही दोन हजाराची नोट दिसली नाही. या दोन हजाराच्या नोटा कुठे गायब झाल्या हे देवाला माहीत. काला धन नावाच्या या सर्कस मधुन काही हाती लागले आहे असे वाटत नाही.







