आर्णी तील“प्रभाकिरण इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पहिला दिवस उत्साहवर्धक वातावरणात संपन्न
आर्णी:आर्णी येथील ‘प्रभाकिरण इंग्लिश मीडियम स्कूल’ या शाळेचा पहिला दिवस लहान लहान मुलांच्या किलबिलटासह आणि विविध उपक्रमासह उत्साहवर्धक वातावरणात पार पडला. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शिक्षक शिक्षिकांनी सकाळी साडेदहा वाजता सर्व प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्य द्वारावर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा उत्साहाने स्वागत करण्यात आले.
मुख्यद्वार रंगीबेरंगी फुग्यांनी आणि ‘सुस्वागतम’ या चमकदार शब्द अक्षरांनी सजविले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानावर विविध क्रीडा उपक्रमात भाग घेऊन शिक्षकांनी त्यांचा उत्साह वाढविला. यामध्ये विद्यार्थ्यांनी रिंग गेम (मुली) रेसिंग म्हणजे धावण्याची शर्यत (मुले) म्युझिकल चेअर म्हणजेच संगीतखुर्ची (मुली) बोल थ्रोईंग म्हणजे चेंडू टोपली फेकणे (मुले) आणि लगोरी (मुली) अशा विविध क्रीडा उपक्रमात आपला सहभाग नोंदवून शाळेच्या पहिल्या दिवसाला संस्मरणीय बनविले दुपारी दोन वाजेपर्यंत हे उपक्रम चालू होते
त्यानंतर दुपारी पहिल्या दिवसाच्या समारोपाच्या वेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष इंजिनीयर अन्सार सर तसेच संचालक गुलाम सर व नावे सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करुन चालू शैक्षणिक क्षेत्राकरिता शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन अशोक सकाळ आंसर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका शाजिया खान यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभा किरण इंग्लिश मीडियम स्कूल चे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले







