शिरपूर तालुका शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाची कार्यकारिणी जाहीर
स्व.विश्वस रंध्रे क्रीडा संकुल शिरपूर येथे २२/६/२०२२ रोजी शिरपूर तालुका क्रीडा शिक्षक महासंघ यांची पंचवार्षिक निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यासाठी राज्याचे उपाध्यक्ष व कोअर कमिटी सदस्य डॉ. आनंद पवार , जेष्ठ मार्गदर्शन श्री व्ही.एस.मराठे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील निवड करण्यात आली.
शिरपूर तालुक्यातील क्रीडा शिक्षक बंधू-भगिनी यांनी प्रचंड उत्साहात यांची निवड प्रक्रियेत सहभाग घेतला .सर्व पदांची निवड ही सर्वानुमते करण्यात आली .त्यात शिरपूर तालुका अध्यक्ष म्हणून आर.सी.पटेल विद्यालय चे क्रीडा शिक्षक श्री मनोज पाटील व तालुका सचिव म्हणून डॉ.पी.आर.घोगरे कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री राधेश्याम पाटील पदी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यकारिणी खालील प्रमाणे
अध्यक्ष-श्री मनोज शिवाजीराव पाटील
उपाध्यक्ष -श्री विजय शांताराम बागुल
उपाध्यक्ष-श्री विजय एकनाथ शिसोदे
सचिव– श्री राधेश्याम जिजाबराव पाटील
कार्याध्यक्ष– श्री दुष्यंत बाळकृष्ण पाटील
सहसचिव– श्री रामसिंग चतुरसिंग सिसोदे
सहसचिव– श्री दीपक रवींद्र गोसावी
खजिनदार– श्री सचिन रामदास कुमावत
संघटक श्रीमती ज्योत्स्ना ईश्वर जाधव
प्रसिद्धी प्रमुख– श्री नूर इस्माईल तेली
मार्गदर्शन सदस्य
श्री वसंत साहेबराव मराठे श्री कृष्णदास पंडित पाटील
सदस्य
श्री रावसाहेब सोमा चव्हाण
श्री अशोक धुडकू महाजन श्री राजेंद्र उखा चौधरी
श्री दिनेश सत्तारसिंग पावरा श्री तुषार मनोहर माळी
श्री जिग्नेश शिवरामपराडके श्री उमेश सुरेश बोरसे
श्री मोहसिन शकील कुरेशी







