शेतकरी बांधवांच्या सावधानतेने अनर्थ टळला:-
मांजरे प्रतिनिधी
रघुनाथ ठाकरे
नंदुरबार तालुक्यातील मांजरे गावातील शेतकरी श्री अमृत यादवराव पाटील हे सकाळी नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतात जात होते सकाळी 8 वाजता गेले आणि त्यांनी त्यांची गाडी क्रमांक. -एम.एच.३९.एच.९३०६ मोटारसायकल झाडाखाली उभी करून तेही खाटल्यावर बसले असता त्यांच्या पाठीमागून चक्क कोब्रा नाग येताना त्यांनी पाहिला आणि त्यांनी हालचाल न करता त्या सांपावर लक्ष ठेवले असता तो मोटारसायकलच्या सीटखाली घूसतांना त्यांनीं पाहिला.


त्यानंतर त्यांनी आजूबाजूला असलेल्या शेतकरी बांधवांना बोलावून याबाबत सांगितले त्यानंतर जूनमोहिदे गावातील सर्पमित्रला श्री पवन पाटील बोलावून या कोब्रा नागाला पकडून सुरक्षित जागी सोडण्यात आले.


हा गोब्रा साप आजूबाजूच्या शेजारी असलेल्या शेतकरी बांधव.. बलराज पाटील, मुकेश पाटील, रघुनाथ पाटील, गणेश पाटील यांनाही वारंवार दिसून येत असल्याने आणि अमृत पाटील या शेतकरी बांधवांच्या सावधानतेने अनर्थ टाळता आला.



थोडक्यात तमाम शेतकरी बांधवांना आग्रहाची विनंती करण्यात येते की, आता पावसाळा सुरू झाला आहे खरिप हंगामाला सुरूवात झाल्याने आपल्या शेतात सावधानतेने काम करावे व स्टार्टर पेटी, मोटारसायकल, झोपडीत आदी ठिकाणी साफसफाई ठेवावी व सावध राहावे







