लेखन एक प्रवास .
व्यक्ती तश्या प्रवृती ह्या समाजात असतात
प्रतिनिधी स्नेहा उत्तम मडावी
. प्रत्येक व्यक्तीला कश्या ना कश्या ची आवड असते . छंद असतो . तसा च एक आवड जोपासलेला व्यक्ती आज त्या बद्दल थोडस जाणून घेऊ . होय . लेखक निलेश रमेश परब . राहणार मुंबई घाटकोपर , मूळ गांव केरवडे , तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग .
खरतर लेखन हा छंद हा बालपणापासून नव्हता . 12 वी पर्यन्त शिक्षण हे मूळ गावी झाली . पण पुढे शिक्षण यात तेव्हढं रस नाही . सुरुवातीला मुंबईत आल्या नंतर काही दिवस नोकरी ही केली ,पण त्यात सूत जमेना . घरात मालिका वगरे घरची मंडळी बघायची , त्यावेळी अस वाटायच की आपण ही यात काम कराव . पण तशी ओळख नव्हती . पण कशी बशी ओळख निर्माण करून फिल्म क्षेत्रात प्रवेश केला . सुरुवातीला स्टार प्रवाह वरील लक्ष , पंचनामा या मालिकेतून छोटेखानी भूमिका ही केल्या .व त्यात विशेष रुचि निर्माण झाली . पण
एक दिवस आमचे मित्र अभिनेते लेखक अनिल शिंदे हे एक व्यावसायिक नाटक करत होते . नाट्यमंदार ही संस्था होती आणि नाटक होत कधी घरी कधी शेजारी . आणि त्यात एक मालवणी लेडी पात्र होत , खरतर ते मूळ मराठी होत आणि ते मालवणी ह्या भाषेत करायच होत . त्यावेळी त्यांना एका सहायक लेखन करणाऱ्या लेखकाची आवश्यकता होती . त्यावेळी त्यांनी माझ नाव सुचवल , आणि तिथुन माझ्या लेखनाला सुरुवात झाली . त्या नंतर मागे न वळून बघता मी माझा लेखन प्रवास सुरू केला .
लेखकांकडे सर्वात मोठा प्रश्न असतो की आपल लेखन पब्लिश कुठे करायच , त्यावेळी माझा मित्र तन्मय गावडे याने मला प्रतिलिपि एप बाबत माहिती दिली . आणि माझ्या कथा मी त्यात प्रकाशित करू लागलो . आता पर्यन्त यावर कथा , कविता , कथा मालिका एकांकिका असे जवळपास 86 साहित्य प्रकाशित केले असून जवळपास 5 लाख पेक्षा जास्त वाचक समुदाय त्याला लाभलेला आहे . मन शांती ही कथा जवळपास 1 लाख पेक्षा जास्त लोकानी वाचली असून बंद स्टुडिओ आणि ती रात्र , आणि तो रस्ता संपत नव्हता ह्या दोन कथा मालिका विशेष लोकांच्या पसंतीस पडल्या आहे . सध्या ह्या एप वर लेडी वॉश रूम ही कथा मालिका सुरू असून त्याचे जवळपास 19 भाग प्रकाशित झाले आहे . आज ह्या कथा मालिकेला ही वाचकांचा उदंड प्रतिसाद येत आहे . नुकतच प्रतिलिपी या एप कडून प्रतीलिपी गोल्डन बॅच प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलेल आहे .
लेखनात वारंवार मदत म्हणून अनेक व्यक्ती यांचा मार्गदर्शन म्हणून वरदहस्त आहे . त्यात विशेष म्हणजे मित्र अभिनेता लेखक समीक्षक दर्शन जाधव . जो वारंवार विशेष मार्गदर्शन करत असतो . शिवाय किरण मोते ही सुद्धा लेखनी साठी विशेष मदत करत असते . शिवाय घरी आई वडील भाऊ यांचा विशेष सपोर्ट याने ही लेखन करण्यास विशेष बळ येत .
तूर्तास फ्यूचर जनरल लाईफ ह्या कंपनीत नोकरी करत असून ,लेखन हे नोकरी सांभाळून करत आहे . विशेष नोकरीत ही मला विशेष सांभाळून घेत आहे . त्यामुळे लेखन करायला वेळ मिळत असतो . भविष्यात उत्तम नाटक सिनेमा लेखन करण्याचा मानस आहे .त फक्त तुम्हा सर्वांची साथ ही मोलाची ..
लेखक : निलेश रमेश परब .







