विखरण खु . विकास सोसायटी चेअरमनपदी नरेश पाटील
विखरण ( ता . शिरपूर) येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदासाठी कृषी उपन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक नरेश विश्वासराव पाटील तसेच व्हाइस चेअरमन पदासाठी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव बळीराम धनगर या दोघांचा एक एक अर्ज असल्याने यांची बिनविरोध निवड करण्यात आली
निवडीसाठी आयोजित बैठकीस सोसायटीचे संचालक अंबरराव शंकरराव भदाणे , शकुंतला शिवाजी भदाणे , प्रमोद साहेबराव भदाणे, राजेंद्र सुधाकर भदाणे, शैला सुनिल भदाणे, रविंद्र वसंतराव भदाणे, छबिलाल जयवंतराव भदाणे, शामकांत सुभाष भदाणे, अरुण लोटन पाटील, शांतिलाल बळीराम शिंदे,उपस्थित होते.
निवडणुक निर्णय अधिकारी सुधीर शिवाजी ईशी होते. सचिव कैलास सोमनाथ बडगुजर यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचीत चेअरमन व्हाइस चेअरमन तसेच सर्व संचालक मंडळाचा सत्कार माजी जि . प सदस्य वसंतराव पोपट पाटील माजी चेअरमन अंबरराव शंकर पाटील ग्रा. प सदस्य किशोर पाटील संजय पाटील यांनी केला.
निवड बिनविरोध करण्यासाठी माजी सरपंच शामकांत पाटील , शिवाजी पाटील , सुनिल पाटील यांनी परिश्रम घेतले.







