• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

मोबाईल बॅटरीच्या उजेडात करावी लागली महिलेची प्रस्तुती….महातपुरी पी एस सी मधील प्रकार,डीपी बंद असल्याने घडला प्रकार

माणगंगा by माणगंगा
July 19, 2022
in महाराष्ट्र
0
मोबाईल बॅटरीच्या उजेडात करावी लागली महिलेची प्रस्तुती….महातपुरी पी एस सी मधील प्रकार,डीपी बंद असल्याने घडला प्रकार

मोबाईल बॅटरीच्या उजेडात करावी लागली महिलेची प्रस्तुती

महातपुरी पी एस सी मधील प्रकार,

डीपी बंद असल्याने घडला प्रकार

गंगाखेड प्रतिनिधी

प्रस्तुती वेदना जाणवत असल्याने दवाखान्यात आणलेल्या महिलेची प्रस्तुती लाईट नसल्याने मोबाईल बॅटरीच्या उजेडावर करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार महातपुरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घडला. मंगळवारी सखाराम बोबडे पडेगावकर यांनी निवेदन देत हा डीपी तात्काळ बसवावा अशी मागणी केली आहे.

महातपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास विद्युत पुरवठा करणारा महावितरण चा डीपी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतच आहे. पण मागील सहा दिवसापासून तो डीपी नादुरुस्त आहे. हा डीपी दुरुस्त केला जावा यासाठी मागील पाच दिवसापासून गावातील सामाजिक कार्यकर्ते शेख मुस्तफा, शेख अमजद, ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष जानकीराम वाळवटे, दीनानाथ घिसडे आदींनी महावितरण अधिकाऱ्याकडे पाठपुरावा केला होता.

पण महावितरणच्या अधिकाऱ्याकडून कसलीही दाद दिली गेली नाही .डीपी बंद असल्याचा रिपोर्ट तुम्ही स्वतः परभणीला घेऊन जा मगच डीपी येत असे उत्तर अधिकारी ग्रामस्थांना देत होते .याच प्रकारात गावातील एका महिलेस प्रस्तुती साठी दवाखान्यात आणण्यात आले. इन्वर्टरची कॅपॅसिटी संपल्याने तेही चालत नव्हते. नाईलाजाने या महिलेची प्रस्तुती उपस्थित असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मोबाईल बॅटरीच्या उजेडावर करावी लागली .हा डीपी बंद असल्याने जिल्हा परिषद शाळेतील पाण्याचा बोरही बंद असल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजाने स्वच्छ पाणी मिळायचे बंद झाले. गावात 33 केव्ही उपकेंद्र असूनही कायमस्वरूपी लाईनमेन अभावी वीज पुरवठा खोळंबला आहे.

यासंदर्भात ग्रामस्थांनी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना या विषयात लक्ष घालावे अशी विनंती केली. बोबडे यांनी मंगळवारी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या कार्यालयास लेखी निवेदन देऊन विजापुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण ला आदेशित करावे ही विनंती केली. या निवेदनावर सखाराम बोबडे पडेगावकर ,राहुल साबने आदींच्या स्वाक्षरी आहेत. महातपुरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ बने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दवाखान्यात अंधार असल्याची कबुली दिली.

Views: 178
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सर्वसामन्यांना मंत्रालयात पाण्याची बाटली नेण्यास बंदी;आत्महत्या रोखण्यासाठी गृह विभागाचा निर्णय

सर्वसामन्यांना मंत्रालयात पाण्याची बाटली नेण्यास बंदी;आत्महत्या रोखण्यासाठी गृह विभागाचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)