• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कपाशीवरील रस शोषक किडी व गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करा

माणगंगा by माणगंगा
August 3, 2022
in महाराष्ट्र
0
कपाशीवरील रस शोषक किडी व गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करा

कपाशीवरील रस शोषक किडी व गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करा

कृषी विभाग व कृषी विद्यापिठाने सुचविल्या उपाययोजना

 ललिता खोंडे 

त-हाडी: कापूस पिकावार सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, तुडतुडे आणि फुलकिडे ह्या रस शोषक किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर मावा ह्या किडीचा प्रादुर्भाव जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून आढळून येतो. तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून व फुलकिड्यांचा प्रादुर्भाव ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून आढळून येतो. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव डोमकळ्यांच्या स्वरुपात ऑगस्ट महिन्यात दिसून येतो.
या सर्व प्रकारच्या किडींमुळे कपाशी पिकाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी सुरवातीपासूनच पुढे दिलेल्या उपाययोजनाचा अवलंब करून या किडींचे व्यवस्थापन केल्यास पिकाचे होणारे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी करता येते. बीटी कपाशीच्या बियाण्याला ईमाडाक्लोप्रीड किंवा थायोमेथॉक्साम कीटकनाशकांची बीज प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे रस शोषक या किडीपासून सर्वसाधारण २ ते ३ आठवड्यापर्यंत संरक्षण मिळते. म्हणून या काळात किटकनाशकांची फवारणी करू नये. वेळोवेळी प्रादुर्भावग्रस्त फांदया, पाने व इतर पालापाचोळा जमा करून किडींसहित नष्ट कराव्यात. पिकांमध्ये उगवणीनंतर आठ ते दहा दिवसानंतर पिवळे चिकट सापळे हेक्टरी २५ या प्रमाणात लावून नियमित पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे.


कपाशीत चवळीचे आंतर पीक घ्यावे या चवळी पिकावर कपाशीवरील किडीच्या नैसर्गिक शत्रु कीटकांचे पोषण होते. वेळेवर आंतर मशागत करून पीक तणविरहीत ठेवावे त्यामुळे किडीच्या पर्यायी खाद्य तणांचा नाश होईल. बांधावरील किडीच्या पर्यायी खाद्य तण जसे अंबाडी, रानभेंडयांची झाडे इत्यादी नष्ट करावीत. मृदा परीक्षणाच्या आधारावर खतमात्रेचा अवलंब करून जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा. दोन ओळीतील व दोन झाडातील अंतर योग्य तेच ठेवावे जेणेकरून कपाशीची अनावश्यक कायीक वाढ होणार नाही. पीक दाटणार नाही पर्यायाने अशा पीकावर किडही कमी प्रमाणात राहील.
रस शोषक किडीवर उपजिवीका करणारे नैसर्गिक किटक उदा. सीरफिड माशी, कातीन ढालकिडे, क्रायसोपा इत्यादी संख्या पुरेशी आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळावा.

रसशोषक कीडीसाठी कपाशीचे पिकाचे प्रादुर्भावाबाबत सर्वेक्षण करावे. सरासरी संख्या १० मावा/पान किंवा २ ते ३ तुडतुडे/पान किंवा दहा फूलकिडे/पान किंवा मावा, तुडतुडे आणि फुलकिडे यांची एकत्रित सरासरी संख्या दहा/ पान किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकाचा वापर करावा. त्यासाठी बुप्रोफेजीन २५ टक्के प्रवाही २० मि.ली. किंवा डॉयफेथ्युरॉन ५० टक्के पाण्यात मिसळून भूकटी १२ ग्रॅम किंवा फिप्रोनिल ५ टक्के प्रवाही ३० मि. ली. किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के २.५ मि.ली. यापैकी कोणतेही एका किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.


पीक उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसांनंतर फेरोमोन सापळ्याचा वापर करावा. पिकाच्या वाढीव अवस्थेच्या उंचीनुसार किमान एक फूट अंतर ठेवावे जेणेकरून फेरोमोन सापळ्याचा प्रभाव वातावरणात पसरण्यास मदत होईल. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमोन सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळ्यामधे आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत तसेच मास ट्रॅपिंग करीता हेक्टरी १५ ते २० फेरोमोन सापळे लावावेत. प्रत्येक गावात, कापूस संकलन केंद्रे व जीनींग फॅक्टरीमधे १५ ते २० कामगंध सापळे लावून दर आठवडयाने पतंगाचा नायनाट करावा.


पिकातील डोमकळ्या नियमित शोधून त्या अळयासहीत नष्ट कराव्या म्हणजे पुढील पिढयांचा जीवनक्रमास वेळीच आळा घालता येईल. पिक उगवणी नंतर ३५ ते ४० दिवसांपासून दर पंधरा दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझॅडिरेक्टिन ३००० पीपीएम ४० मिली प्रति १० लीटर पाण्यात याप्रमाणे फवारणी करावी. पिक उगवणी नंतर ७५ ते ८० दिवसांनी १२ ते १५ दिवसांच्या अंतराने ट्रायकोग्रामा बॅक्ट्री किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस या परोपजीवी मित्र किटकांची १.५ लक्ष अंडी प्रति हेक्टरी चार वेळा शेतात सोडावी.


गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक आठवडयाला एकरी शेताचे प्रतिनीधीत्व करतील अशी २० झाडे

निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुले, पात्या व बोंडे संख्या मोजून त्यात गुलाबी बोंड अळीग्रस्त फुले, पात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी. प्रादुर्भावग्रस्ताची टक्केवारी ५ टक्के पेक्षा जास्त आढळल्यास खाली पुढीलप्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही ३० मिली किंवा क्लोरेंट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी ३ मिली किंवा थायोडिकार्ब ७५ टक्के भुकटी २० ग्रॅम किंवा फिप्रोनील ५ टक्के एससी ३० मिली किंवा लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ईसी १२ मिली यापैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. असे आवाहन कृषी विभाग आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ, अकोला यांनी केले आहे.

Views: 295
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सोनियाजी गांधींशी गैरवर्तन करणाऱ्या स्मृती इराणी माफी मागा : संध्या सव्वालाखे ….केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या डहाणुतील घरावर महिला काँग्रेसची धडक

सोनियाजी गांधींशी गैरवर्तन करणाऱ्या स्मृती इराणी माफी मागा : संध्या सव्वालाखे ....केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या डहाणुतील घरावर महिला काँग्रेसची धडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)