दोंडाईच्यात संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने पालखी मिरवणूक संपन्न….
दोंडाईचा- (श. प्र.) नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शहर नाभिक समाजाच्या वतीने पालखी मिरवणूक काढण्यात आली. समाजातर्फे श्री संत शिरोमणी संतसेना महाराज यांच्या पालखीचे पुजन शहराध्यक्ष छोटू महाले यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रतिमापूजनाचा मान प्रमुख पाहुणे म्हणून आलेले माजी मंत्री डॉ हेमंतराव देशमुख उद्योगपती सरकार साहेब रावल, माजी नगराध्यक्ष डॉ रविंद्र देशमुख, ज्ञानोपासक शिक्षण संस्थेचे संचालक अमित पाटील यांनी केले.
संत सेना महाराज यांची पालखी मिरवणूकीला शहरातील पंचवटी मंदिर येथून सुरुवात होऊन गांधी चौक, गाव दरवाजा, जामा मजीद, अभिषेक चित्र मंदिर, मार्गाने पिंपळ चौक पुन्हा पंचवटी मंदिर येथे सांगता करून सत्यनारायण पुजेचा मान राजेश मिस्तरी यांना देण्यात आला होता. तर पालखी दरम्यान कुरकवाडे ता. शिंदखेडा येथील भजनी मंडळाची साथ लाभली होती.
यावेळी शहराध्यक्ष छोटू महाले, तालुकाध्यक्ष रवींद्र चित्ते, युवक मंडळाचे अध्यक्ष समाधान ठाकरे, दुकानदार संघाचे अध्यक्ष किरण सुर्यवंशी, अनिल ईशी, सुनील सैंदाणे, कैलास चित्ते, राजेंद्र सोलंकी, महेंद्र चित्ते, दिलीप सैंदाणे, भावराव सैंदाणे, पी यू पवार, साहेबराव पवार, बोरसे बापू, राजेंद्र मोरे, गोकूळ सैंदाणे, शशिकांत खोंडे, संजय सैंदाणे, गणेश पवार, दिनेश बोरसे, रमेश चित्ते, सुभाष ईशी, श्रावण भदाणे, जगदिश बोरसे, गोपाल बोरसे, देविदास चित्ते, राजेंद्र सैंदाणे, संजय पवार, लोटन पवार, मच्छिंद्र पवार, मनोहर निकम, रमेश सैंदाणे, कैलास पवार, भोला सैंदाणे, विलास शिरसाठ, विशाल महाले, सुनील सैंदाणे, कैलास सैंदाणे, सचिन बोरसे, मुकेश चित्ते, रमेश खोंडे, सोनू पवार, गुलाब पवार, अजय पवार, अनिल चित्ते, जयेश वसाने, शिवम महाले, सागर भदाणे, यासह शहरातील व ग्रामीण भागातील समाज नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते….







