मुसळधार वादळी पावसामुळे डोंगरगाव परिसरातील शेती पिकांचे व घरांचे नुकसान भरपाईची मागणी. __
_____________________________
डोंगरगाव ( प्रतिनिधी) आर आर पाटील डोंगरगाव आणि परिसरात 31 ऑगस्ट रोजी रात्री वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला या पावसामुळे शेतातील कडधान्य बाजरी ज्वारी मका ऊस कापूस इत्यादी पिके बऱ्याच शेतांमध्ये कमी-अधिक प्रमाणात जमिनीकडे आडवे पडले आहेत या पावसामुळे कडधान्य बाजरीची प्रत खराब होणार आहे
कापूस पीक एकमेकांमध्ये गुरफटल्याने बोंडांच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होऊन वेचणीस मोठा अडथळा निर्माण होऊन जास्तीची मजुरी लागेल याच दिवशी गावातील आदिवासी वस्तीत आसाराम एकनाथ भि ल या गरीब आदिवासी च्या झोपडीवर झाड आडवे पडले
त्यामुळे झोपडीतील जीवनाश्यक वस्तू कपडे भांडी इ चे नुकसान झाले सुदैवाने प्राणहानी झाली नाही याच वस्तीत अजून काही आदिवासींच्य्या झोपल्या पडलेल्या आहेत
त्यामुळे सकाळी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील व पत्रकार आरआर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन त्या कुटुंबांचे सांत्वन करून शिंदखेडा तहसीलदार व तलाठी यांना फोन केलेत तातडीने तहसीलदार सुनील जी सैंदाणे यांनी तलाठी बडगुजर यांना घटनेचा पंचनामा करण्यास पाठविले सोबत कृषी पर्यवेक्षक स्मिता पान पाटील कोतवाल योगेश कोळी यानी संबंधित ठिकाणाचा पंचनामा केला
परंतु शासनाने परिसरातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसानीचा मोबदला द्यावा अशी मागणी परिसरातील असंख्य शेतकऱ्यांसह जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांनी शासनाकडे केलेली आहे







