शिरपूर येथे आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस मोठ्या उत्साहात साजरा
त-हाडी:- येथील गुर्जर भवनात सनातन धर्म रक्षक धर्मवीर गुर्जर सम्राट राजा मिहीर भोज जयंती व आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला , यावेळी तालुक्याभरतील गुर्जर बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ,
अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यात कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेचे प्रदेश सल्लागार ऍड मंगलसिंग चौधरी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेचे प्रदेश अध्यक्ष तथा राष्ट्रीय संघटनमंत्री विजयसिंह गुर्जर भोरटेककर व गुर्जर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड शांताराम महाजन हे होते ,
ऍड मंगलसिंग चौधरी , विजयसिंह गुर्जर , शांताराम महाजन यांनी दीपप्रज्वलन करून गुर्जर सम्राट राजा मिहीर भोज यांची प्रतिमा पूजन केले . विजयसिंह गुर्जर यांनी आंतरराष्ट्रीय गुर्जर दिनाचे महत्त्व विशद केले तर ऍड मंगलसिंग चौधरी यांनी गुर्जर सम्राट राजा मिहीर भोज यांचे साम्राज्य व पराक्रम इतिहासातील नोंदी सांगितल्या , यावेळी काशिनाथभाई गुर्जर ,पत्रकार प्रशांत चौधरी , अविनाशभाई गुर्जर , प्रा व्ही बी पाटील , नामदेव गुर्जर , पंचायत समितीचे माजी सदस्य छगन गुर्जर , जी ओ पाटील , हिरालाल चौधरी , गजानन जाधव , राजेंद्र गुर्जर , चंद्रकांत गुर्जर , प्रदीप गुर्जर , विष्णू पाटील , महेंद्र पवार ,ईश्वर गुर्जर , दीपक पाटील ,राजेंद्र पाटील , महेश्वर गुर्जर आदी समाज बांधव उपस्थित होते , सूत्रसंचालन प्रशांत चौधरी यांनी केले तर आभार विजयसिंह गुर्जर यांनी व्यक्त केले







