नवनियुक्त मुंबई विद्यापीठ संचालक डॅा. प्रसाद कारंडे यांचा सन्मान
कलिना विद्यापीठ मुंबई येथे …….
सत्कार माणदेशी रत्नांचा……
झरे ता आटपाडी जि सांगली गावचे सुपुत्र श्री. डॅा. प्रसाद कारंडे यांची मुंबई विद्यापीठाच्या
Director, Board Of Examination and Evaluation या मानाच्या पदावर नियुक्ती मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करताना प्रा नारायण खरजे, राजकुमार पाटील, शामराव ठोंबरे व सर्व पश्चिम महाराष्ट्र संघटनेचे पदाधिकारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ कारंडे यांनी परिसराचे नाव रोषण केलेच आणि नव नवीन पदाधिकारी यांना शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळा आदर्श घालून दिला. आजच्या सत्कार केला बद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले.
खरच असे सन्मानाचे स्थान मिळालेेबद्दल आम्हा पदाधिकारी यांना अभिमान वाटतो तसेच सर्वसामान्य कुटुंबातील पदाधिकारी एका असामान्य कामगिरी करून एका भव्य दिव्य उंचीवर पाऊल ठेऊन एवढे यश संपादन करतात हे खरच उल्लेखनीय आणि अभिमानास्पद आहे असे मत प्रा नारायण खरजे यांनी व्यक्त केले.
आजही शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करायची असेल प्रचंड मोठी इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर गरुडझेप घेऊन यश मिलवू शकतो यासाठी योग्य उदाहरण म्हणजे डॉ प्रसाद कारंडे. पुन्हा एकदा त्यांचे पश्चिम महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आणि आम्हा सर्व मित्र परिवार यांच्या वतीने या अभिमानास्पद नियुक्ती बद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.