मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था तऱ्हाडी व ग्रामीण मराठी पत्रकार संघ तऱ्हाडी यांच्या संयुक्त शिक्षक दिनाच्या निमित्ताने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम संपन्न .
त-हाडी:- शिक्षक दिनाचे औचित्य साधून रविवारी रोजी आर.सी.पटेल प्राथमिक शाळा मेन बिल्डिंग शिरपूर येथे शिरपूर नगरपरिषद च्या माजी नगराध्यक्ष संगिता देवरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थिती शिक्षण विस्तार अधिकारी ई.बी.आव्हाड.,डी.पी.बुवा डॉ.निता सोनवणे व तापी परिसर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे व माजी लिनेस क्लब अध्यक्ष कविता बाविस्कर शारीरिक शिक्षक संघटना माजी अध्यक्ष अशोक महाजन. बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण सचिव जयश्री चव्हाण प्रा.दिलवरसिंग गिरासे . महेंद्र खोंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था दरवर्षी शिरपूर तालुक्यातील आप आपल्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते . या वर्षी खालील शिक्षकांना सन्मान चिन्ह. प्रमाणपत्र व बुके देऊन गौरविण्यात आले विशेष सत्कार शिरपूर पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी डॉ निता सोनवणे यांना जिल्हा परिषद धुळे कडून आदर्श अधिकारी म्हणून गौरविण्यात आले होते तर त्यांचा मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था तऱ्हाडी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला
१)श्री छोटू देवराव पाटील (मुख्याध्यापक)
आर.सी .पटेल प्राथमिक मराठी शाळा, शिरपूर जि. धुळे
२) श्री संतोष नानाभाऊ पाटील (उपशिक्षक)
आर सी पटेल माध्यमिक विद्यालय अहिल्यापूर , ता. शिरपूर
३) श्री पंकज दगा बेडसे (उपशिक्षक)
शासकीय इंग्लिश मेडियम आश्रम शाळा शिरपूर ,जि. धुळे
४) श्री रामेश्वर पांडुरंग माळी (उपशिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदर्डे ता. शिरपूर
५) श्री नरेंद्र गोकुळ मराठे (उपशिक्षक)
अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा जळोद ता. शिरपूर
६) श्री चेतनकुमार विनायकराव पाटील.
(उपशिक्षक)
कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर विद्यालय वाडी ता.
शिरपूर
७)सौ. कल्पना सुनील पाटील (उपशिक्षिका)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवे लोंढरे ता. शिरपूर
८)श्री कांतीलाल भगवान लोहार (उपशिक्षक)
शिवराम भीमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय शिरपूर जि.धुळे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण यांनी केले व सूत्रसंचालन विवेक ठाकरे यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक सी.डी.पाटिल त्याचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वीपणे पार पाडला







