एच.आर. पटेल कन्या. विद्या.वरूळ येथे शिक्षक दिवस उत्साहात साजरा
त-हाडी
एच आर.पटेल कन्या माध्यमीक व उच्च माध्य विद्यालय वरूळ येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिना निमित्ताने शिक्षक दिवस उत्साहात पार पडला. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो . यादिवशी शाळेचं संपूर्ण दिवसभराचे कामकाज इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनींनी सांभाळले. ममता धर्मेंद्र ईशी या विद्यार्थिनीने मुख्याध्यापकाची तर दिक्षा मराठे हिने उपमु ख्याध्यापकाची भूमिका निभावली. सर्व शिक्षिका बनलेल्या विद्यार्थ्यांनींना छानशी भेट देण्यात आली.
शाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यार्थीनि मुख्याध्यापिक ममता ईशी हिने भूषवले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष व प्राचार्य एस एन जोशी यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्राचार्य एस एन जोशी यांनी राधाकृष्णन यांचे जीवनकार्य तसेच शैक्षणिक प्रगती व आजच्या शिक्षणाची परिस्थिती यातील फरक काय आहे व विद्यार्थ्याने शिक्षकांप्रती आदर कसा ठेवायला पाहिजे याचे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनींनी अध्यापन करत असतांना शिक्षक म्हणून काय अनुभव आले शिक्षकांना वर्गात अध्यापन करत असताना कोण कोणत्या गोष्टी कराव्या लागतात व विद्यार्थ्यांचे मन राखून विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने अध्यापन कराव लागते याचे अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक बी एन पाटील, डी एन माळी, एम व्ही पाटील,एस एच निकुंभे ,एम बी पाटील, पी आर मोरे ,एस एस पाटील, वाय डी पाटील, . एस सी शिंपी, आर एम मोरे,एन एस म्हस्के, एस एम झटकर सर्व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.
फोटो – वरुळ एच आर पटेल कन्या माध्यमिक विद्यालयात शिक्षकाची भूमिका निभावताना विद्यार्थीनीं







