ग्रामीण भागातील रस्ते मोकळा श्वास घेणार का ? प्रवाशांना पडला प्रश्न
त-हाडी
शासनाने ग्रामीण रस्ते विभागाच्या अंतर्गत वरूळ ते जूनी अंतुर्ली हा चार किलोमीटरचा रस्ता चांगल्या पद्धतीने बनविलेला आहे. या रस्त्याची देखभाल पाच वर्षापर्यंत संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर बंधनकारक आहे. या रस्त्याच्या साईड पट्ट्यांवर काटेरी झाडे झुडपे वाढल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वीच दोन मोटरसायकल स्वार यांच्यात टक्कर झाली. याचे कारण रस्त्यापर्यंत आलेल्या काटेरी झाडांमुळे समोरून येणारे वाहन दिसले नाही. या अपघातात दोन्ही मोटर सायकल स्वार जखमी झाले आणि दोन्ही मोटरसायकलींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
रस्त्याच्या साईड पट्टीवरील काटेरी झाडे झुडपे वाढल्याने पुन्हा अपघात होऊ शकतात आणि दुर्दैवाने यात कोणाचा मृत्यू झाला तर त्याचे कुटुंब उध्वस्त होऊ शकते. ही दुर्दैवी घटना घडण्याअगोदर या रस्त्यावरील काटेरी झाडे झुडपे काढण्यात यावी अशी मागणी वरूळ, जवखेडा, अंतुर्ली गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी केलेली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण रस्ते विभागाच्या कार्यकारी अभियंता साहेबांनी वरूळ ते जूनी अंतुर्ली रस्त्यावरील काटेरी झाडे झुडपे काढण्याबाबत संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सूचना द्यावी व त्या कामाची पूर्तता करून घ्यावी.
या रस्त्यावर शेतकरी ग्रामस्थ यांचा मोठ्या प्रमाणावर वापर असल्याने अपघात पुन्हा अपघात होऊ शकतात. जर या रस्त्यावरील झाडे झुडपे काढणे कामासाठी दिरंगाई केली अथवा दुर्लक्ष केले तर संबंधित शेतकरी ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. तसेच दुर्दैवाने गंभीर स्वरूपाच्या घटना घडल्या तर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी संबंधित कार्यकारी अभियंता व कॉन्ट्रॅक्टर यांची राहील. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकांन्वये संबंधित गावातील शेतकरी व ग्रामस्थांची मागणी आहे.
द्वारा—
प्रा.पी.एस.अंतुर्लीकर
( माजी उपसभापती पंचायत समिती शिरपूर )







