श्रीमती उषाबाई देवरे यांचा सत्कार
जळोद आश्रमशाळेतील उपशिक्षिका श्रीमती उषाबाई राजाराम देवरे मॅडम यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी व पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी स्व. खा. कन्या स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी शिरपूर चे अध्यक्ष अशोकजी पाटील साहेब व सचिव ताईसो योगिता पाटील यांनी त्यांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला व त्याच्या दत्तक घेतलेला मुलाला आशीर्वाद देऊन अध्यक्षांनी रु. 21000/- धनादेश देखील दिला. यावेळी संस्थेचे सीईओ श्री बोरसे सर, संस्थेचे पदाधिकारी श्री रवींद्र शेलार सर व आश्रम शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक श्री प्रशांत मराठे सर उपस्थित होते.







