तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना वाघाडी आश्रमशाळेत जल्लोषात सुरुवात
त-हाडी
एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय धुळे अंतर्गत आर. सी. पटेल अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, वाघाडी, ता. शिरपूर, जि. धुळे येथे दिनांक 14 सप्टेंबर 2022 वार बुधवार रोजी एकुण 14 आश्रमशाळांमधील सर्व वयोगटनिहाय तालुकास्तरीय आश्रमीय क्रीडा स्पर्धा प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधीकारी मा. तृप्तिजी धोडमिसे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना जल्लोषात सुरुवात झाली. अनुदानित आश्रमशाळा वाघाडी टीम व स्टाफ़ सह क्रीडा समिती व मुख्याध्यापक यांच्या सर्वांच्या योगदानाने उत्साहवर्धक व अतिउत्तम नियोजनात क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली.
यात मुले व मुली मिळून एकुण 972 खेळाडुनी खेळाडू वृत्ती जोपासत आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात वाघाडी आश्रमशाळेतील मुलींच्या लेझिम पथकाने मान्यवरांचे स्वागत करुन झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. एन. डी. जानकर (सहा. प्रकल्प अधिकारी प्रशासन, धुळे) यांनी आपल्या मनोगतात खेळाचे महत्व स्पष्ट केले तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा. श्री. विजय भडगांवकर (सहा. प्रकल्प अधिकारी शिक्षण, धुळे), मा. श्री. पी. के. ठाकरे (सहा. प्रकल्प अधिकारी शिक्षण, धुळे), मा. श्री. भाऊसो. गोपालजी भंडारी (संचालक, आश्रमशाळा विभाग SES शिरपूर), मा. श्री. डॉ. उमेशजी शर्मा (CEO SES शिरपूर), मा. श्री. बी. ए. आव्हाड (सहा. प्रकल्प अधिकारी शिक्षण, धुळे), मा. श्री. के. एम. सनेर, मा. श्री. एस. एस. पाटील, क्रीडा समन्वयक श्री. डी. आर. पाटील, माध्यमिक विभाग समन्वक (आश्रम) श्री. एच. के. कोळी, प्राथमिक विभाग समन्वयक (आश्रम) श्री. बी. बी. सोनवणे उपस्थित होते.
क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करुन व क्रीडा प्रतिज्ञा श्री एम. व्ही सूर्यवंशी सर यांनी खेळाडुंकडुन वदवुन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक प्राचार्य श्री. के. जे. राजपूत यांनी केले व अनुमोदन मुख्याध्यापक श्री. जी. एम. पाटील यांनी केले. बहारदार सुत्रसंचलनाने श्रीमती. एन. एन. कुलकर्णी व श्री. जे. एम. धनगर यांनी कार्यक्रमात रंगत आणले. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे लिपीक श्री. अमित परदेशी तसेच आर. सी. पटेल अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले







