डोंगरगाव येथे गुरांचे लम्पी लसीकरण यशस्वी *.
_______________________________
डोंगरगाव ( प्रतिनिधी ) आर आर पाटील डोंगरगाव आणि परिसरात गाई सह गुरांवर लम्पी आजाराचे लक्षणे दिसून येत होती त्यामुळे जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांनी शासनाकडे खलाणे गटासाठी दोन हजार लसींची मागणी केली होती वृत्ताची व या मागणीची दखल घेत शासनाने 21 सप्टेंबर 20 22 रोजी डोंगरगाव येथे एक हजार लम्पी प्रतिबंध लसी उपलब्ध करून दिल्या होत्या या दिवशी लस शिबिराची सुरुवात जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत होऊन या दिवशी गावातील सुमारे चारशे गुराढोरांना या लसी देण्यात आल्या
यावेळी प्रकाश पाटील यांचेसह ग्रा प सदस्य संजय भाईदास पाटील पत्रकार आर आर पाटील माजी सरपंच अशोक पाटील नागराज पाटील पशुवैद्यकीय अधिकारी वालखेडा जे एल सोनार पशुवैद्यकीय परिचर एमआर दाभाडे डॉक्टर चित्ते डॉक्टर अभिजीत पाटील इत्यादींनी परिश्रम घेत पशुवैद्यकीय लसीकरण शिबिर यशस्वी करून घेतले खलाणे गटात टप्प्याटप्प्याने प्रत्येक गावात लम्पी लसीकरण करून घेऊ असे पशुवैद्यकीय अधिकारी वालखेडा जे एल सोनार यांनी सांगितले







