मंगल समीर सोरटे या आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने सन्मानित.
नातेपुतेश्रीकांत बावीस्कर:
जि. प.सोलापूर व महिला बाल विकास विभाग यांचे वतीने सन २०२१/२२ देण्यात येणारा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार नातेपुते येथील अंगणवाडी क्र.६ भवानी मंदिर पांढरे मळा येथे कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका सौ.मंगल समीर सोरटे यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ दिलीप स्वामी,मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार,उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, मा. जि.परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे,जिल्हा महिला व बालकल्याण कार्यक्रम अधिकारी शेख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .सोलापूर येथे जमगुंडी मंगल कार्यालय येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
सौ.मंगल सोरटे या बारा वर्षांपासून अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत.ज्या ज्या वेळी शासनाचे नवीन उपक्रम किंवा नवीन ॲप येतात तेव्हा त्या स्वतः प्रशिक्षण घेऊन नंतर इतर सहकारी सेविका यांना समजावून सांगण्याचे काम करत असतात.त्या निवडणूक विभागाकडे BLO म्हणून काम करत असताना नुकतेच त्यांनी मतदान ओळख पत्राशी आधार लिंक शंभर टक्के पूर्ण केले त्या सम्यक संस्थेच्या कार्यकारी संचालक म्हणून सामाजिक कार्यात सहभागी असतात .त्यांना यासाठी प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड,पर्यवेक्षिका माधवी सोनार यांचे विशेष सहकार्य लाभले.
सौ.मंगल सोरटे यांचे जि. प. मा.उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख,रिपाईचे प.महा.नेते एन के.साळवे, रिपाइं तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे,कार्याध्यक्ष समाधान भोसले, जि. प.सदस्य महेश सोरटे,नगरसेवक अविनाश दोशी,रावसाहेब पांढरे, मा.सरपंच अमरशील देशमुख, मा.सरपंच रेडे बाबासाहेब कांबळे, मा.सरपंच लोणंद मनीषा भीमराव होळ, मा.सरपंच नातेपुते कांचन दादा लांडगे,मुख्याध्यापिका सुनंदा जाधव,मुख्याध्यापक विकास बडवे,ग्रामसेवक बंडुकुमार होळ, प्रा. डॉ.हमीद काझी, प्रा. गुळीग,रणजित गायकवाड,घेमाड सर,दत्तात्रय काळे सर, प्रा. एस एस शिंदे, प्रा.रोहिदास सावंत(सासवड),वैद्यकीय अधिकारी डॉ नम्रता व्होरा,डॉ. काजल कवितके, डॉ.राजेंद्र केंगार,डॉ.विशाल कांबळे,उद्योजक चंद्रकांत सोनवणे,विठ्ठल रुपणवर (मुंबई),संदीप जगताप (शिरवळ),स्वप्नील गांधी, प्रा. शमा मुलाणी, प्रा. स्वाती सावळकर सोमेश्वर, प्रा.मनीषा डोंबे बारामती,पुष्पलता कवटे ग्रंथपाल पुणे,प्रगतशील बागायतदार विजय पिसाळ,पोलिस पाटील शेखर ओव्हाळ पाटील,प्रशांत सोरटे पाटील,सहा.पोलिस निरीक्षक पंढरपूर मनोज सोनवलकर,सहा.पोलिस उप निरीक्षक चाकण अनिल लोहकरे,सम्यक संस्थेच्या अध्यक्षा सौ संध्या सोरटे,रिपाईचे युवक नेते आप्पा सावंत यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.







