*कापूस शेतकऱ्यांची शेतीशाळा
त-हाडी प्रतिनिधी
- भटाणे – तऱ्हाडी येथील शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे मान्य तालुका कृषी अधिकारी शिरपूर अनिल निकुंभ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस पिकाची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना अंतर्गत मौजे तऱ्हाडी, ममाने, भटाणे शिवारात कापूस पिक प्रात्यक्षिक १०० हेक्टर क्षेत्रावर राबविण्यात येत आहे अंतर्गत कापूस पीक शेतकऱ्यांची शेतीशाळाचे माध्यमाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व कापूस उत्पादन वाढ करण्याच्या दृष्टीने
शेतकऱ्यांना विविध उपाय योजना सुचविण्यात आले त्यात नरेश भाईदास सोनवणे यांच्या कापुस क्षेत्रात वर जाऊन कापूस पीक परिसंस्थेच्या अभ्यास पिकाचे निरीक्षणे घेऊन प्रत्यक्ष कृतीतून पिकावरील नुकसानकारक शत्रू कीड ओळख आणि मित्र किडींची ओळख करणे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन ,कामगंध सापळे , निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, रस शोषणारे किडी मावा, तुडतुडे, फुलकिडे ,पांढरी माशी यांचे नियंत्रण बाबत मार्गदर्शन ,गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन, मका पिकावरील लष्करीअळीचे व्यवस्थापन , एकात्मिक तण व्यवस्थापन, मृद आरोग्य पत्रिका आधारित किंवा जमीन सुपीकता निर्देशांक व पीक शिफारस नुसार एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थपन व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार फवारणीद्वारे खते देणे ,ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा वापर करणे. असे उपाय योजना कृषी सहाय्यक महेंद्र पाटील यांनी सुचविण्यात आले, १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२२ हा सेवा पंधरवडा कार्यक्रम माध्यमातून केंद्र शासन सहाय्यित पंतप्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवण्यासाठी सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाविषयी माहिती देऊन शेतकरी गटांना व वैयक्तिक लाभासाठी शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसायबाबत , महा डी बी टी पोर्टल विविध अनुदानाचे योजना बाबत अडचणी , पि एम किसान,खरीप हंगाम पिक विमा संरक्षण योजना रब्बी हंगामात राबवायचे कृषि विस्तार योजना बाबत. कृषी सहाय्यक महेंद्र पाटील यांनी माहिती दिली व पिक विमा योजनेबाबत, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत नाडेप व गांडूळ युनिट ,फळबाग लागवड योजना, महाडीबीटी पोर्टल कृषी यांत्रिकीकरण योजना कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी सुधीर ईशी ,कृषी पर्यवेक्षक एन एन महाजन आणि ललित पाटील कृषि सहाय्यक यांनी सेवा पंधरवाडा कार्यक्रम ,विवीध योजनेविषयी माहिती दिली. शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित श्री महेंद्र पाटील यानी गावातील प्रगतशील शेतकरी व पदाधिकाऱ्यांचे आणि उपस्थित मार्गदर्शन साठी उपस्थित कृषी अधिकारी व कर्मचारीचे आभार मानले







