भोरखेडा विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जंतनाशक गोळ्या वाटप
त-हाडी
आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त इयत्ता 5वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना प्राचार्य आर एफ शिरसाठ व पर्यवेक्षक पी व्ही पाटील यांच्या उपस्थितीत जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले,
विद्यार्थ्यांना स्वच्छता विषयी मार्गदर्शन करताना प्राचार्य आर एफ शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना जंतांमुळे अशक्तपणा, थकवा,भूक न लागणे अशी लक्षणे दिसतात तेव्हा या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने दिलेल्या जंतनाशक गोळ्या प्रत्येक विद्यार्थ्याने घेणे आवश्यक आहे
असे मत व्यक्त केले त्यासाठी प्रथम पोषण आहार वाटप करून विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या वाटप करण्यात आल्या यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंमसेवकांना पर्यवेक्षक पी व्ही पाटील यांच्या हस्ते जंतनाशक गोळ्या वाटप केल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी एन वाय बोरसे तर आभार आर जी पाटील यांनी मानले एन डी चव्हाण, सुनिल पाटील, मीना पटेल,व्ही बी शर्मा, शशिकांत पाटील, सुधाकर देसले,पुनमचंद चौधरी, वसंत ऐशी, वाल्मिक पाटील,डी आर राजपूत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते







