ह .भ .प. मृदंगमहर्षी बाबुराव डवरी यांचे महाराष्ट्राला लाभलेले योगदान
बाबुराव डवरी-निनगुर आजचे नेकनुर.
नेकनूर पाटोदा ;
आता कोठे धावे मन /
तुझे चरण देखलिया//
भाग गेला शीण गेला/
अवघा झाला आनंद//
या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे बाबुराव डवरी यांच्या जीवन कार्यावर लेखन रुपी प्रकाश टाकताना मनाची अवस्था अशी झाली आहे.इ.स. १८९९ मध्ये
बाबुराव डवरी यांचा जन्म नाथसंप्रदायात झाला लहानपणी बाबुराव डवरी यांच्या अंगात ताल सूर व लय यांचा त्रिवेणी संगम होता. त्यांचे वडील भागूजी डमरू म्हणजे डवर उत्कृष्ट वाजवयाचे हे वाद्य बाबुराव डवरी लहानपणीच वाजवायला शिकले. गावात जेथे भजन असे तेथे बाबुराव डवरी जात असायचे हळूहळू त्यांना भजनाचा छंद जडला त्यावेळी अंगात ताल धरायला शिकले त्यावेळी वैकुंठवाशी बंकटस्वामी महाराज बाबुराव डवरीना हात वाद्याच्या तालावर हलवताना पाहून डवरी यांना महाराज बोलावून घेऊन विचारतात तुला पखवाज वाजवायला शिकायचा आहे का क्षणाचाही विलंब न लावता बाबुराव डवरी ,”हो” म्हणाले, तेव्हा महाराजांनी बाबुरावांना आपल्या बरोबरच पखवाज शिकण्यासाठी घेऊन जातात व मृदंग वाजवायला शिकवतात अवघ्या आठ वर्षीच असताना बाबुराव गौरी पखवाज वाजवायला शिकले पुढे महाराज यांनी बाबुरावांना आपले पट्टशिष्य करून घेतले आणि आपल्याबरोबर पैठण, पंढरपूर,व आळंदी या ठिकाणी बाबुरावांना नेत असत नवनवीन बोल शिकवून उत्कृष्ट मृदंग वादक त्यांना बनविले बंकट स्वामी महाराज बरोबर डवरी जवळ जवळ ४० वर्षे राहिले. उत्तम पखवाज पट्टू बनले महाराष्ट्रातील मृदंग वाजवण्याची मुळ खोड म्हणजेच बाबुराव डवरी होत .भजन आणि कीर्तनात नवनवीन ताल निर्मिती बाबुराव डवरी यांनी केली. द्रुपद ,धमार, झपताल, एकताल, खेमटा ,चौताल ,दीप चंपी ,आडाचौताल, पंचम सवरी, धुमाळी हे ताल बाबुराव डवरी निर्माण करून ताल लेखन केले एका मात्राचे चार भाग करून गायन पद्धती शोधल्या मुळे बाबुराव डवरी यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली लोक बाबुरावना” तालाचे घड्याळ” म्हणून संबोधायचे त्यांची ख्याती संगीत व मृदंग तबला शिकवण्याची पद्धतच वेगळी आणि स्वनिर्मित होती.
महाराष्ट्रातील त्याकाळची नामांकित कीर्तनकार मंडळी बाबुराव डवरी यांना आपल्याकडे आकर्षित करून घेत असत. कारण त्यांचे किर्तन वादयामुळे उत्कृष्ट व परिणामकारक होत असे .दोन दोन दिवस किंवा अखंड हरिनाम सप्ताह मध्ये एक दोन दिवस बळच डवरी यांना लोक आपल्या गावी ठेवून घेत असत त्यावेळी बाबूराव हे नवीन शिकाऊ मंडळींना दोन दिवसात पखवाज शिकवून परिपूर्ण करत त्याकाळचे ह .भ. प .भिमसिंह महाराज ह .भ. प .वामनभाऊ महाराज ह .भ .प .भगवानबाबा ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडी कर बाबुराव यांच्या गुरुस्थानी असायचे व कीर्तनात डवरी त्यांना जबरदस्त साथ देत असायचे बाबूराव सामान्य माणसांच्या पंक्तीत बसून जेवण करत असत तसेच एस .टी.ने प्रवास करत असत त्यांनी त्यांच्या जीवनात पैशाला महत्त्व दिले नाही फक्त महाराष्ट्रात मृदंग वादक ही परंपरा कशी निर्माण होईल याकडे त्यांचा कल होता तसेच बाबुराव डवरी हे कीर्तन सुद्धा करत असायचे ते आपल्या कीर्तनात लोकांना खदखदून हसवायचे एकंदर त्यांचे कीर्तन विनोदी असायची संपूर्ण महाराष्ट्रात बाबुराव डवरी यांनी शिष्य मंडळी व पखवाज वादक तयार केले ही परंपरा आजही महाराष्ट्रात चालू आहे जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत ही परंपरा चालूच राहणार अगदी ९० वर्षापर्यंत बाबुराव पखवाज वादन तेवढ्याच जोमात करत असायचे. त्यांना कधी थकवा येत नसे महाराष्ट्रात सांप्रदायिक कीर्तन चक्रीभजन ताल शास्त्र अशा विविध अंगाने कलावंत घडविण्याचे श्रेय बाबुराव डवरी
गुरुजींना जाते ते मानसन्मान पैसा आणि प्रसिद्धी यांना कधी हात हापापलेले नव्हते .केवळ संगीतासाठी आपले संपूर्ण जीवन त्यांनी व्यतीत केले त्याकाळी एकदा सातारा येथे कीर्तनात बाबुराव यांची मृदंग वाजविण्याची कला माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी स्वतः पहिली व ते अचंबित झाले. बाबुराव यांची त्यांनी चौकशी केली संगीत क्षेत्रात कलेमुळे व योगदानामुळे पवार साहेबांनी बाबुराव डवरीना “मृदंगमहर्षी “ही पदवी हजारो श्रोत्यांसमोर दिली खरं तर बाबुराव डवरी नावाने महाराष्ट्र शासनाने दरवर्षी एखादा पुरस्कार जाहीर करायला हवा असे माझे वैयक्तिक मत आहे अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाच्या वतीने आम्ही शासनाला विनंती करणार आहोत .आजही बाबुराव डवरी यांची तिसरी पिढी त्यांच्या कलेला वाव देत आहेत त्यांची परंपरा आजही पुढे चालवत आहेत.
आपुलिया हिता जो असे जागता/ धन्य माता पिता तयाचिया
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा//
याप्रमाणे बाबुराव गौरी गुरुजींचे मुलं कै.चंद्रकांत ,पंढरीनाथ, आणि मोहनराव यांनी थोड्याफार प्रमाणात बाबुराव डवरी यांची कला पुढे चालू ठेवली परंतु व्यापार व उद्योगधंदे यांकडे आकर्षीत झाल्यामुळे म्हणावी तेवढी कला जोपासली नाही परंतु आज सध्याच्या परिस्थितीला मात्र बाबुराव यांचे नातू ही कला पुढे चालवत आहेत संगीत विशारद पदवी घेऊन आजोबा ची कला जोपासत आहे
यात ह.भ.प. लक्ष्मीकांत,प्यारेलाल आणि केदारनाथ हे तीनही नातू आज नामांकित मृदंग वादक तबला वादक आणि गायकही आहेत लक्ष्मीकांत आळंदी सरकारी सेवा करत असताना आपल्या आजोबा ची कला जोपासत आहेत पुण्यासारख्या विद्यानगरीत तबला मृदंग आणि गायन कले मुळे पुणे येथे प्रसिद्ध आहेत तसेच फडातील कीर्तनकारांच्या कीर्तनात लक्ष्मीकांत आजही साथ देण्याचे काम करत आहेत दुसरे नातू प्यारेलाल खरे नाव बाबुनाथ परंतु पाखवाज वाजविण्याच्या कलेमुळे ते प्यारे झाल्यामुळे महाराज मंडळी त्यांना प्यारेलाल म्हणू लागले.
तसेच तिसरे नातू केदारनाथ चव्हाण हे पेशाने शिक्षक असून आजोबांची कला पुढे चालवत आहेत नाट्य संगीत तबला पेटी आणि गायन कलेत ते पारंगत आहेत या कलेमुळे त्यांनी नाव तर कामावरच परंतु जास्त मित्र परिवार गोळा केला आहे. आजही केदारनाथ हे पेशाने शिक्षक असल्यामुळे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कलेमुळे चांगलेच परिचित झाले आहेत जिल्हा परिषद बीड आणि जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी मंत्री महोदय भेट देत असताना स्वागत गीत म्हणणे किंवा सुत्रसंचालन करणे यासाठी त्यांना सदैव बोलावले जाते या त्यांच्या योगदानामुळे गेल्या महिन्यात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री धनंजय मुंडे साहेब यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले आहे
याज साठी केला होता अट्टाहास/ शेवटचा दिस गोड व्हावा//
आता निश्चिततिने पावतो विसावा/
खुंटलिया धावा तृष्णचिया//
अशाप्रकारे आषाढी एकादशीच्या निमित्त ह.भ.प. मृदंग महर्षी बाबुराव डवरी गुरुजी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याची बुद्धी मला झाली आणि माननीय संपादक साहेब यांनी माझ्या या लेखास प्रसिद्धी दिली त्यामुळे त्यामुळे त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो
संदर्भ ग्रंथ- विश्वकोश.
संजय यलकनाथ सावंत (मुख्याध्यापक)
बंकटस्वामी विद्यालय खडकीघाट ता. जि. बीड
मो. नं.९०७५७८६००२







